भारताचं संविधान बदलणार? ‘भाजप पुन्हा सत्तेत आल्यास…’, उद्धव ठाकरे यांच्या घणाघात

| Updated on: Apr 24, 2024 | 2:40 PM

'घरात काम करणाऱ्यांना या सरकारने झेड प्लस, वाय प्लस सुरक्षा दिली आहे. सर्व सामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर पडली आहे. महिला सुरक्षित नाहीत. सलमानच्या घरावर गोळीबार होतोय. त्यांचा आमदार गणपत गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार, लोकांची सुरक्षा वाऱ्यावर...'

‘घटना आणि संविधान बदलण्याची भिती ही सर्वसामान्यांच्या मनामध्ये खोलवर रूजली आहे. कारण गेल्या संसदेच्या अधिवशेनात विरोधी पक्षाचे खासदार निलंबित करून आपल्याला पाहिजे ती मनमानी करून काही कायदे हे पारित केले गेले. म्हणजेच काय हम करे से कायदा’, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी आणि विशेषतः भाजपवर हल्लाबोल केला. यासह यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केले. पार्थ पवार यांच्या सुरक्षेवर बोलताना ठाकरे म्हणाले, घरात काम करणाऱ्यांना या सरकारने झेड प्लस, वाय प्लस सुरक्षा दिली आहे. सर्व सामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर पडली आहे. महिला सुरक्षित नाहीत. सलमानच्या घरावर गोळीबार होतोय. त्यांचा आमदार गणपत गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करत आहे. लोकांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. पण गद्दारांना कडेकोट बंदोबस्तात ठेवत आहेत. सुरक्षेचा खर्च कोण करतंय हा प्रश्न आहे. लोकांचा कर घेऊन सुरक्षा दिली जात आहे, असा घणाघात केला. उद्धव ठाकरे हे नांदेडमध्ये आले होते. मात्र, वेळेच्या अभावी त्यांनी सभा घेण्याऐवजी पत्रकार परिषद घेतली.

Published on: Apr 24, 2024 02:40 PM