PMAY-G लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी, आता 15 नोव्हेंबरला जन राष्ट्रीय गौरव दिवस साजरा होणार

पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील सामान्य माणसाने कोणत्याही योजनेसाठी भटकू नये आणि त्याचा पैसा कोणत्याही दलालाने हिसकावून घेऊ नये, असा आमचा प्रयत्न आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत पारदर्शकपणे निवड, घरांचे जिओ टॅगिंग, ग्रामसभेत नावाची घोषणा, निष्पक्ष सर्वेक्षण आणि डीबीटी हा याच विचाराचा भाग आहे.

PMAY-G लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी, आता 15 नोव्हेंबरला जन राष्ट्रीय गौरव दिवस साजरा होणार
PM Narendra Modi
Follow us
| Updated on: Nov 14, 2021 | 4:50 PM

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण (PMAY-G) चा पहिला हप्ता त्रिपुरातील 1.47 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना हस्तांतरित केला. पीएम मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले. 700 कोटींहून अधिक रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. या कार्यक्रमात त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब हेदेखील सहभागी होणार आहेत. त्याचवेळी या कार्यक्रमात केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गिरिराज सिंह देखील सहभागी झाले होते.

निष्पक्ष सर्वेक्षण आणि डीबीटी हा याच विचाराचा भाग

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील सामान्य माणसाने कोणत्याही योजनेसाठी भटकू नये आणि त्याचा पैसा कोणत्याही दलालाने हिसकावून घेऊ नये, असा आमचा प्रयत्न आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत पारदर्शकपणे निवड, घरांचे जिओ टॅगिंग, ग्रामसभेत नावाची घोषणा, निष्पक्ष सर्वेक्षण आणि डीबीटी हा याच विचाराचा भाग आहे. तुम्हाला पूर्वीची सरकारेही आठवतील, ज्या काळात कट कल्चरशिवाय कोणतेही काम होत नव्हते.

डबल इंजिनचे सरकार विकासात गुंतले

लोकांना संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, आज प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत देण्यात आलेल्या पहिल्या हप्त्याने त्रिपुराच्या स्वप्नांना नवी गती दिली. मी त्रिपुरातील सर्व लोकांचे, पहिल्या हप्त्याचा लाभ घेतलेल्या सुमारे दीड लाख कुटुंबांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्रिपुराला गरीब ठेवणाऱ्या, त्रिपुरातील लोकांना सुविधांपासून दूर ठेवणाऱ्या विचारसरणीला त्रिपुरामध्ये स्थान नाही. आता इथे डबल इंजिनचे सरकार पूर्ण ताकदीने आणि प्रामाणिकपणे राज्याच्या विकासात गुंतलेत.

पूर्वी विकासाची गंगा येथे येण्यापूर्वीच आटत होती

पंतप्रधान म्हणाले, आज देशाचा विकास ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेने होताना दिसत आहे. विकास हा आता देशाच्या एकता-अखंडतेचा समानार्थी शब्द मानला जातो. पूर्वी आपल्या नद्या देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागातून पूर्वेकडे येत असत. मात्र विकासाची गंगा येथे येण्यापूर्वीच आटत असे, असे ते म्हणाले. देशाचा सर्वांगीण विकास तुकड्या तुकड्यांमध्ये, राजकीय दृष्टीकोनातून पाहिला गेला. त्यामुळे आपले ईशान्येकडे दुर्लक्ष झाले.

लोकांना सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या, आता सरकारच घरी आलेय

लोकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताच्या विकासात आत्मविश्वासाने भरलेल्या भारतातील महिला शक्तीचे मोठे योगदान आहे. या महिला शक्तीचे मोठे प्रतीक, आमच्याकडे महिला बचतगट देखील आहेत. ते म्हणाले, पूर्वी सर्वसामान्यांना प्रत्येक कामासाठी सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या, पण आता सर्व सेवा-सुविधा देण्यासाठी सरकारच तुमच्याकडे येते. पंतप्रधान म्हणाले, पूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळण्याची चिंता असायची, आता त्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळत आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, कमी वेळात किती मोठे बदल घडू शकतात, मर्यादित वेळेत नवीन यंत्रणा निर्माण करता येते, हे त्रिपुराने दाखवून दिले. पूर्वी कमिशन आणि भ्रष्टाचाराशिवाय चर्चा होत नव्हती, पण आज डीबीटीच्या माध्यमातून सरकारी योजनांचा लाभ थेट तुमच्या खात्यात पोहोचत आहे.

15 नोव्हेंबरला आदिवासी गौरव दिन साजरा होणार

पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्याच्या इतिहासात आपल्या ईशान्येकडील आणि देशाच्या आदिवासी सैनिकांनी देशासाठी बलिदान दिले. या परंपरेचा सन्मान करण्यासाठी हा वारसा पुढे नेण्यासाठी देश सतत कार्यरत आहे. या भागात अमृत महोत्सवादरम्यान देशाने आणखी एक मोठा निर्णय घेतलाय. आता दरवर्षी 15 नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिन म्हणून साजरी केली जाणार आहे.

कच्चा घरात राहणाऱ्या लोकांना पक्के घर मिळाले

पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) एका निवेदनात म्हटले आहे की, त्रिपुरातील अद्वितीय भौगोलिक-हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन हप्ता जारी करण्यात आलाय. यासाठी खुद्द पीएम मोदींनी पुढाकार घेतला आणि आता इथे ‘कच्च्या घरा’ ची व्याख्या बदलण्यात आली. अशा प्रकारे कच्च्या घरात राहणाऱ्या लोकांना पक्की घरे दिली जात आहेत. पहिला हप्ता हस्तांतरित केल्याबद्दल मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानलेत. ‘प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण’ ही पंतप्रधान मोदींच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. संबंधित बातम्या

PMAY G: PM मोदी उद्या 1.47 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता देणार, खात्यात थेट 700 कोटी येणार

नोकरी सोडल्यानंतरही पीएफ खात्यावर मिळते व्याज, कधी उपलब्ध होते ही सुविधा?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.