Marathi News » Crime » These famous actresses were killed by their loved ones
PHOTO | Cold Blooded Murder: झगमगत्या दुनियेतील चंद्रकोर, प्रियजनांनीच का तोडला आयुष्याचा दोर? वाचा नेमकं काय घडलं
कौटुंबिक वादातून बांगलादेशी अभिनेत्री रायमा इस्लाम शिमू यांची पतीनेच हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र आपल्याच माणसांकडून निर्घृण हत्या करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गुन्हेगारीच्या इतिहासात अनेकवेळा नात्यांना काळिमा फासत हत्या करण्यात आल्या आहेत.
कौटुंबिक वादातून बांगलादेशी अभिनेत्री रायमा इस्लाम शिमू यांची पतीनेच हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र आपल्याच माणसांकडून निर्घृण हत्या करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गुन्हेगारीच्या इतिहासात अनेकवेळा नात्यांना काळिमा फासत हत्या करण्यात आल्या आहेत. या हत्या केवळ सर्वसामान्यांच्याच झाल्या नाहीत तर अनेक बॉलिवूड कलाकारांनाही आपले प्राण गमवावे लागले आहे. (फोटो सौजन्य : गूगल)
1 / 6
कंदील बलोच : पाकिस्तानी अभिनेत्री, मॉडेल आणि सोशल मीडिया सेलिब्रिटी कंदील बलोचची 2016 मध्ये गळा दाबून हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर दुसऱ्या दिवशी, बलूचचा आणखी एक भाऊ मोहम्मद वसीम याने सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ आणि विधाने करून 'बलूच' कुटुंबाचे नाव बदनाम केल्यामुळे त्याने बलुचची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली होती. (फोटो सौजन्य : गूगल)
2 / 6
लैला खान : अभिनेत्री लैला खान यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. त्यांची आई सेलिना पटेल हिने तीन लग्न केली होती. लैला खानची आई सेलिना यांची मुंबईत करोडोंची संपत्ती होती. एके दिवशी लैला अचानक गायब झाली होती. लैलाच्या आईचा तिसरा नवरा परवेझ याने पैशासाठी संपूर्ण कुटुंबाची निर्घृण हत्या केली होती. हत्येनंतर दीड वर्षानंतर लैलाच्या कुटुंबीयांचे मृतदेह त्यांच्या फार्महाऊसमधून सापडले. (फोटो सौजन्य : गूगल)
3 / 6
मीनाक्षी थापर : मीनाक्षी थापर यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या मित्रांनी त्याचे अपहरण करून त्यांचं मुंडकं छाटलं होतं. मीनाक्षीचे अभिनेता अमित जैस्वाल आणि त्याची मैत्रीण प्रीती सुरीन यांनी अपहरण केले होते, हीरोईन चित्रपटातच एक छोटीशी भूमिका साकारत होती आणि खंडणी न दिल्याने अभिनेत्रीची गोरखपूरमध्ये निर्घृण हत्या करून तिचा शिरच्छेद करण्यात आला होता. (फोटो सौजन्य : गूगल)
4 / 6
प्रिया राजवंश : अभिनेत्री प्रिया राजवंशचे आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हते. प्रियाच्या फिल्मी करिअरची सुरुवात अतिशय नेत्रदीपक असली तरी तिचा शेवट खूप थरारक होता. संपत्तीसाठी चेतन आनंदच्या दोन्ही मुलांनी प्रियाची गळा दाबून हत्या केली होती. शवविच्छेदन अहवालात प्रिया राजवंशचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. (फोटो सौजन्य : गूगल)
5 / 6
शशिरेखा : पतीच्या अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने तमिळ टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री शशिरेखा यांच्या पतीनेच त्यांची हत्या केली होती. शशिरेखा यांचे पती रमेश शंकर यांचे दुसऱ्या अभिनेत्रीशी अफेअर होते. दोघांच्या प्रेमात शशिरेखा अडथळा बनल्या होत्या, त्यामुळे या भीषण हत्येचा कट रचला गेला. अभिनेत्री शशिरेखा यांचे पती रमेश शंकर यांचे शीर धडापासून वेगळे केले होते. रमेश शंकर आणि त्याच्या लिव्ह इन पार्टनरने शशिरेखाचे डोके दोन दिवस बाथरूममध्ये लपवून ठेवले आणि संधी साधून मृतदेहाची विल्हेवाट लावली. (फोटो सौजन्य : गूगल)