Dev Anand | विकला जातोय देव आनंद यांचा 73 वर्षे जुना बंगला; तब्बल इतक्या कोटींची डील

देव आनंद यांचा जुहूमधील बंगला विकला जाणार आहे. या बंगल्याच्या विक्रीची डील पूर्ण झाली असून लवकरच त्या ठिकाणी 22 मजली इमारत उभारण्यात येणार आहे. जाणून घ्या हा बंगला तब्बल किती कोटी रुपयांना विकला गेला?

Dev Anand | विकला जातोय देव आनंद यांचा 73 वर्षे जुना बंगला; तब्बल इतक्या कोटींची डील
Dev AnandImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 19, 2023 | 5:55 PM

मुंबई | 19 सप्टेंबर 2023 : दिवंगत अभिनेते देव आनंद यांनी ज्या सुंदर आणि आलिशान बंगल्यात आपलं आयुष्य व्यतित केलं होतं, तोच बंगला आता विकला जाणार आहे. देव आनंद यांचा मुंबईतील जुहू इथला 73 वर्षे जुना बंगला विकण्यात येणार आहे. देव आनंद हे पत्नी कल्पना कार्तिक आणि सुनील आनंद, देविना आनंद या मुलांसोबत जवळपास 40 वर्षे या बंगल्यात राहिले होते. एका वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, हा बंगला आता एका रिअल इस्टेट कंपनीला विकण्यात येत आहे. या विक्रीची डील पक्की झाली असून कागदपत्रेही तयार करण्यात आली आहेत.

बंगल्याची डील निश्चित

देव आनंद यांचा हा बंगला तब्बल 350 ते 400 कोटी रुपयांना विकला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. या बंगल्याची डील निश्चित करण्यात आली आहे. ज्या रिअल इस्टेट कंपनीला हा बंगला विकला जाणार आहे, ती कंपनी या बंगल्याच्या जागी 22 मजली इमारत उभी करणार आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि डिंपल कपाडियासुद्धा या बंगल्याजवळच्या परिसरात राहिले आहेत. ज्यावेळी देव आनंद यांनी हा बंगला बांधला होता, त्यावेळी फार कमी लोकांना जुहूबद्दल माहित होतं, असं म्हटलं जातं. मात्र तोच परिसर आता मुंबईतील सर्वांत प्रसिद्ध जागांपैकी एक आहे.

बंगल्याविषयी देव आनंद काय म्हणाले होते?

एका जुन्या मुलाखतीत देव आनंद त्यांच्या बंगल्याविषयी म्हणाले होते, “मी माझं जुहूमधील घर 1950 मध्ये बांधलं होतं. त्यावेळी जुहू म्हणजे एक छोटंसं गाव होतं आणि तिथे पूर्ण जंगल होतं. मला ती जागा खूप आवडली होती, कारण मी एकटाच होतो. मात्र त्याच जुहूमध्ये आता प्रचंड गर्दी वाढली आहे. विशेषकरून रविवारी या परिसरात खूप वर्दळ असते. जुहूमधील समुद्रकिनारासुद्धा आता पहिल्यासारखा राहिलेला नाही. मी राहणाऱ्या आयरिस पार्क निवासमध्ये आता कोणताच बगीचा नाही. माझ्या घरासमोर एक शाळा आणि चार बंगले आहेत.”

हे सुद्धा वाचा

या वर्षाच्या सुरुवातीला कपूर कुटुंबीयांची जुनी हवेलीसुद्धा विकण्यात आली होती. राज कपूर यांचा चेंबूरमधील बंगला फेब्रुवारी महिन्यात विकला गेला. गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने या बंगल्याला खरेदी केलं होतं. त्या बंगल्याच्या जागीसुद्धा रिअल इस्टेट बिझनेस होणार असल्याचं कळतंय. याशिवाय गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडनेच राज कपूर यांचा आर. के. स्टुडिओ 2019 मध्ये खरेदी केला होता.

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.