AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Ameesha Patel | ‘कहो ना प्यार है’ म्हणत इंडस्ट्रीत प्रवेश, 3 जणांना डेट केल्यानंतरही एकाकी जीवन जगतेय अमिषा पटेल!

अमिषाने आतापर्यंत तिच्या कारकीर्दीत 40 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तथापि, अमिषाच्या या कारकीर्दीला मनोरंजन विश्वात विशेष स्थान मिळाले नाही. तर आपल्या आजवरच्या आयुष्यात 3 व्यक्तींना डेट केल्यानंतरही अमिषा अद्याप एकाकी जीवन जगात आहे.

Happy Birthday Ameesha Patel | ‘कहो ना प्यार है’ म्हणत इंडस्ट्रीत प्रवेश, 3 जणांना डेट केल्यानंतरही एकाकी जीवन जगतेय अमिषा पटेल!
अमिषा पटेल
| Edited By: | Updated on: Jun 09, 2021 | 10:37 AM
Share

मुंबई : बॉलिवूडमधील आपल्या पहिल्याच चित्रपटाने चाहत्यांची मने मोहून टाकणारी अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) हिला कोण ओळखत नाही? आपल्या कारकीर्दीत सर्व प्रकारच्या प्रोजेक्टवर काम करणार्‍या अमीषा पटेल हिचा आज (9 जून) वाढदिवस आहे. अमीषाचा जन्म 9 जून 1976 रोजी मुंबई येथे झाला होता. आमिषाने करिअरची सुरुवात 2000 साली ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटामधून केली होती. या चित्रपटाने अमिषाला रातोरात सुपरस्टार बनवले (Happy Birthday Ameesha Patel know about actress love life).

अमिषाने आतापर्यंत तिच्या कारकीर्दीत 40 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तथापि, अमिषाच्या या कारकीर्दीला मनोरंजन विश्वात विशेष स्थान मिळाले नाही. तर आपल्या आजवरच्या आयुष्यात 3 व्यक्तींना डेट केल्यानंतरही अमिषा अद्याप एकाकी जीवन जगात आहे.

विक्रम भट्ट यांच्याशी संबंध

जेव्हा अमिषा तिच्या करिअरच्या अगदी सुरुवातीच्या काळात होती, तेव्हा प्रसिद्ध अभिनेता विक्रम भट्ट यांच्याशी अभिनेत्रीचे नाव जोडण्यात येत होते. त्यांचे अनेक किस्से देखील समोर येऊ लागले होते. असे म्हटले जाते की, दोघांनी जवळजवळ 5 वर्षे एकमेकांना डेट केले होते. अमिषाचे कुटुंबीय या दोघांच्या नात्याविरूद्ध होते. अमिषाने एकदा हे स्पष्ट केले होते की, विक्रमशी तिचे नातेसंबंध तिच्या कुटुंबातील सदस्यांना आवडत नाहीत, ज्यामुळे घरात वाद वाढले होते.

कणव पुरीशी नातं

यानंतर अभिनेत्री अमिषा पटेल हिचे नाव लंडनमधील व्यावसायिक कणव पुरीशीही जोडले गेले होते. कणव आणि अमिषा एकमेकांना डेट करत आहेत, अशा बर्‍याच बातम्या आल्या होत्या. अमिषाने स्वत: एकदा असे म्हटले होते की, ती कणवला डेट करत आहे. पण 2010 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअपची पुष्टी आमिषाने टाईम्स ऑफ इंडियाशी केलेल्या संभाषणातही दिली होती (Happy Birthday Ameesha Patel know about actress love life).

नेस वाडियाशी जोडले नाव

प्रीती झिंटा आणि नेस वाडियाच्या अफेअरबद्दल बर्‍याचदा चर्चा होत असे, पण अमिषा पटेल हिचे नाव व्यावसायिक नेस वाडियाशीही जोडले गेले होते, हे चाहत्यांना फारसे ठाऊक नसेल. असे म्हटले जाते की, ते दोघेही एकमेकांच्या नात्याविषयी खूप गंभीर होते. अगदी नेसलासुद्धा अमिषाशी लग्न करायचे होते. मात्र, त्या काळात अभिनेत्रीने तिचे करिअर निवडले होते.

एकेकाळी रणबीर कपूर आणि अमिषा पटेल यांच्या नात्याविषयी देखील कुजबुज सुरु झाल्या होत्या. मात्र, या गोष्टींवर कधीही अधिकृत शिक्कामोर्तब झाले नाही आणि स्वत: अमिषाने याविषयी काहीही म्हटले नाही. पण, अभिनेत्री अमिषा पटेल अजूनही एकटं जीवन जगत आहे आणि सोशल मीडियावर तिच्या बोल्ड स्टाईलने अनेकदा चाहत्यांना घायाळ करत आहे. चाहत्यांनी अमिषाला बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चांगल्या चित्रपटात पाहिले नाही. या अभिनेत्रीला अखेर बिग बॉस 13 मध्ये पाहिले होते. पण शोमध्ये ‘मालकीण’ म्हणून दिसणार्‍या अमिषाला अचानक घराबाहेर करण्यात आले होते.

(Happy Birthday Ameesha Patel know about actress love life)

हेही वाचा :

Devmanus : देवमाणसाला शिक्षा द्यायला नव्या ‘मॅडम’ची एन्ट्री, पाहा कोण आहे ‘ही’ अभिनेत्री

Photo : श्वेता तिवारीची लेक पलकचा ग्लॅमरस अवतार, सोशल मीडियावर धुमाकूळ

मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप.