
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही कायमच चर्चेत असते. करीना कपूर खान हिचा लेक तैमूर अली खान तूफान चर्चेत आहे. तैमूर अली खान याला थेट गोल्ड मेडल मिळाले आहे. विशेष म्हणजे तैमूर अली खान याला हे गोल्ड मेडल तायक्वांडोमध्ये मिळाले. इतक्या कमी वयामध्ये थेट गोल्ड मेडल तैमूर अली खान याने मिळवले. नुकताच तायक्वांडोची एक स्पर्धा ही पार पडली. या स्पर्धेमध्ये इतरही अनेक स्टारचे मुले सहभागी झाले. यामध्ये तैमूर अली खान याने तर धमाकाच केला. आता या स्पर्धेतील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसत आहेत.
तैमूर अली खान याच्याकडे तायक्वांडोचा येलो बेल्ट आहे. तैमूर अली खान याला गोल्ड मेडल मिळाल्यानंतर आई करीना कपूर खान ही आनंदी दिसली. लेकाला सपोर्ट करण्यासाठी करीना कपूर खान ही स्पर्धेमध्येही पोहचली होती. फक्त करीना कपूर खान हीच नाही तर यावेळी काजोल ही देखील उपस्थित दिसली आहे. काही फोटो याचे व्हायरल झाले.
तायक्वांडोच्या या स्पर्धेमध्ये सर्वांना हरवत तैमूर अली खान याने थेट गोल्ड मेडल मिळवले. तैमूर अली खान सुरूवातीपासूनच चर्चेत असलेले नाव. विशेष म्हणजे तैमूर अली खान हा सोशल मीडियावर चर्चेत असलेला विषय. काही दिवसांपूर्वीच करीना कपूर खान हिच्या घरी आलिया भट्ट ही मुलगी राहा हिला घेऊन पोहचली होती.
यावेळी आलिया भट्ट आणि राहा यांना सोडण्यासाठी तैमूर अली खान हा खाली आल्याचे बघायला मिळाले. करीना कपूर खान आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ मिळाल्यावर कुटुंबियांसोबत खास वेळ घालवताना दिसते. काही दिवसांपूर्वीच करीना कपूर ही सैफ अली खान, तैमूर अली खान आणि लहान मुलगा जेह याच्यासोबत विदेशात गेली.
यावेळीचे काही खास फोटो हे करीना कपूर खान हिने सोशल मीडियावर शेअर केले. यावेळी सर्वजण धमाल करताना दिसले. करीना कपूर खान हिने शेअर केलेले हे फोटो तूफान व्हायरल झाले. चाहते या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसले. करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांनी एकमेकांना काही वर्षे डेट करून लग्न केले.