AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

12 वर्षांच्या बालकीर्तनकाराकडून बंजारा भाषेतील कीर्तन ऐकून सर्वजण थक्क; जिंकली प्रेक्षकांची मनं

सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' या शोच्या मंचावर 12 वर्षांच्या बालकीर्तनकाराने बंजारा भाषेत कीर्तन म्हटलंय. कीर्तनकारांना उत्तम व्यासपीठ मिळून देणारा हा मंच आणि सहभागी स्पर्धक यांची चांगलीच चर्चा रंगली आहे.

12 वर्षांच्या बालकीर्तनकाराकडून बंजारा भाषेतील कीर्तन ऐकून सर्वजण थक्क; जिंकली प्रेक्षकांची मनं
ह.भ.प. यशस्वीताई आडे महाराज Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 10, 2025 | 1:23 PM
Share

सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ च्या मंचावर वेगवेगळ्या वयोगटातील अनेक स्पर्धक सहभागी झाले आहेत. या सहभागी स्पर्धकांमध्ये सर्वात लहान स्पर्धकही आली आहे, जिने आपल्या कीर्तनातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. कीर्तनकारांना उत्तम व्यासपीठ मिळून देणारा हा मंच आणि सहभागी स्पर्धक यांची चांगलीच चर्चा रंगली आहे.

कीर्तनाची गोडी । देव निवडी आपण ।। कोणी व्हारे अधिकारी । त्यासी हरी देईल ।। आंगी वैराग्याचे बळ । साही खळ जिणावे ।। उरेल ना उरी । तुका करी बोभाट ।।

तुकाराम महाराज म्हणतात, देव स्वतःहून कीर्तन करणाऱ्यांच्या कीर्तनात गोडी आहे की नाही ते ठरवतो आणि गोडी मिळाल्यास तिथं स्वतः जातीने हजर राहतो अन्यथा नाही. आजवर प्रत्येकाने कीर्तन ऐकलं असेल मात्र बंजारी भाषेत कीर्तन हे ऐकून तुमचेही कान तृप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’च्या मंचावर सर्वात चिमुरड्या 12 वर्षीय ह.भ.प. यशस्वीताई आडे महाराजांचं बंजारा भाषेतलं कीर्तन ऐकण्याची सुवर्णसंधी या शोच्या निमित्ताने महाराष्ट्राला उपलब्ध झाली आहे.

घरातील धामिर्क कार्यक्रमांमुळे ह. भ. प. यशस्वीताई आडे लहानपणापासूनच कीर्तनाची गोडी लागली. या मंचावर ह.भ प. यशस्वीताई आडे यांनी बंजारा भाषेतील संत सेवालाल यांचं कीर्तन करून उपस्थित प्रेक्षक आणि परीक्षकांना मंत्रमुग्ध केलं. ‘छोटी मुक्ताई’ असा गौरव परीक्षकांनी यावेळी केला. संत नामदेवांचं कीर्तनही तिने यावेळी सादर केलं. गुरुवारी हा भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

केवळ भाषेच्या बंधनात अडकून न राहता कीर्तनाचा प्रसार आणि प्रचार वेगवगळ्या भाषांच्या माध्यमातून होत ज्या वयात मनसोक्त खेळायचं, बागडायचं, आईवडिलांकडे हट्ट करायचा असं ह.भ.प. यशस्वीताई आडे हिचं वय. मात्र, ही चिमुरडी आज आपल्या रसाळ वाणीतून वारकरी संप्रदायाची महती साता समुद्रापार पोहोचावी यासाठी प्रयत्न करतेय. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार…’ हा रिअ‍ॅलिटी शो सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे.

मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.