Russia SU 57 E Offer India : दिल्ली स्फोटाच्या तपासादरम्यान रशियाची भारताला पाकिस्तानचे धाबे दणाणतील अशी मोठी ऑफर
Russia SU 57 E Offer India : रशिया भारताचा सच्चा मित्र आहे. दोन्ही देशांमध्ये 60 च्या दशकापासून व्यापारी, संरक्षण संबंध आहेत. भारताची बहुतांश शस्त्र रशियन बनावटीची आहेत. आता दिल्ली स्फोटाचा तपास सुरु असताना रशियाने भारताला मोठी ऑफर दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढणार आहे.

दिल्ली स्फोटाचा तपास सुरु असताना रशियाने भारताला संरक्षणासंदर्भात एक मोठी ऑफर दिली आहे. त्यामुळे नक्कीच पाकिस्तानचं टेन्शन वाढेल. मॉस्कोने आपलं सर्वाधिक एडवांस्ड फिफ्थ-जेनरेशन फाइटर जेट Su-57E च अपग्रेडेड एक्सपोर्ट वर्जन भारताला देऊ केलय. त्याशिवाय भारताला अनलिमिटेड टेक्नॉलजी ट्रान्सफरचा प्रस्ताव सुद्धा दिला आहे. रशियन अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, या ऑफरमुळे भारत-रशियामधील सहादशकापासूनच्या संरक्षण सहकार्याला नवीन ऊर्जा मिळेल. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन डिसेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येत असताना रशियाने ही ऑफर दिली आहे.
दुबई एअर शो मध्ये रशियाने फक्त Su-57E च अपग्रेडेड वर्जन दाखवलं नाही, तर भारताला एक सर्वसमावेशक पॅकेजची ऑफर सुद्धा दिली. यात Su-57E फायटर जेटचा पुरवठा, लायसन्स प्रोडक्शन, नवीन एअर लॉन्च वेपन्स फॅमिली, भारतीय म्यूनिशनचं इंटीग्रेशन, दीर्घकाळासाठी देखभाल आणि सपोर्ट, कुठल्याही निर्बंधांशिवाय टेक्नोलॉजी ट्रान्सफर असं सर्वकाही पॅकेजमध्ये ऑफर केलं आहे.
या फायटर जेटमध्ये काय खास?
पहिलं : Su-57E सर्व निकष पूर्ण करणारं फिफ्थ-जेनरेशन फायटर जेट असल्याचा रशियाचा दावा आहे. त्याच्या बॉडीमध्ये मोठ्या प्रमाणात कंपोजिट मटीरियल वापरण्यात आलं आहे. त्याच्यावर रडार-एब्ज़ॉर्बेंट कोटिंग आहे. शस्त्रांसाठी इंटरनल वेपन बे देण्यात आलं आहे. शत्रुच्या रेंजमध्ये आल्याशिवाय हल्ला करण्याची क्षमता.
दुसरं : रशियाचं म्हणणं आहे की, याची स्टेल्थ डिजाझन इतकी एडवांस्ड आहे की, रडार सक्रीय असताना याचे अत्यंत कमीत कमी सिग्नेचर मिळतात. खऱ्या युद्धात ही क्षमता सिद्ध झाली आहे. दूरवरच्या पल्ल्यासाठी सुपरसॉनिक स्पीड कायम ठेवण्याची या जेटची क्षमता आहे.
तिसरं : कॉकपीट हाय-ऑटोमेशनवर आधारित आहे. यामध्ये AI च्या मदतीने पायलटला तात्काळ निर्णय घेण्यासाठी मदत मिळते. सुरक्षेसाठी यात इंटीग्रेटेड काउंटरमेजर सिस्टिम सुद्धा आहे. याचं ऑनबोर्ड AESA रडार जवळपास 240 किलोमीटरपर्यंतचं टार्गेट ट्रॅक करु शकतं. सोबतच IRST सिस्टिम आणि 360 डिग्री ऑप्टिकल सेंसर मिळून हे विमान फ्लाइंग वॉचटावर बनतं.
चौथं : एअर शो मध्ये Su-57E ने 10 पेक्षा जास्त नवीन एअर-लॉन्च शस्त्रास्त्र दाखवली. लॉन्ग-रेंज एअर-टू-एअर मिसाइल, प्रिसिजन-गाइडेड बॉम्ब आणि स्टँडऑफ स्ट्राइक वेपन्ससह हे जेट अधिक घातक बनतं.
पाकिस्तानच टेन्शन का वाढणार?
रशियाच्या या ऑफरमुळे भारताला फक्त स्टेल्थ फायटर जेटच मिळणार नाहीय, तर हाय-टेक भविष्यातील भरपूर शस्त्रांनी सज्ज अस्त्र मिळणार आहे. शत्रुच्या नजरेत आल्याशिवाय हल्ला करण्याची या जेटची क्षमता याला अजून घातक बनवते. पाकिस्तानकडे आजच्या घडीला असं विमान नाहीय. भारताला रोखणं त्यांना जमणार नाही. त्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये येणं स्वाभाविक आहे.
