
पाकिस्तानची पुन्हा फाळणी होणार का? असा सवाल भारतात नाही तर पाकिस्तानच विचारल्या जात आहे. बांग्लादेश स्वतंत्र झाल्यापूर्वीच बलूची लोकांची स्वातंत्र्याची मागणी आहे. सिंध आणि पंजाब या प्रदेशाच्या सुपीक जमिनीवर या देशाची अर्थव्यवस्था काम करते आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. या प्रांतात पण स्वातंत्र्याचे धुमारे फुटलेले आहेत. पण बलूच लिबरेशन आर्मीने गेल्या काही वर्षात जो निकाराचा लढा सुरू केला आहे. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर आणि प्रशासन जेरीस आल्याचे दिसते. पाकिस्तानच्या जुलूमशाहीला कंटाळून बांग्लादेश स्वतंत्र झाला. तिथे तख्तपलट करण्याचे आयएसआयचे स्वप्न पूर्ण झाले. पण देशातंर्गत सुरू असलेली बंडखोरी त्यांना थोपवता आलेली नाही. सध्या पाकिस्तानचे अनेक बडे अधिकारी आणि नेते बलूचिस्तान लवकरच स्वतंत्र होईल, असे जाहीरपणे सांगत आहेत. स्वतंत्र राष्ट्रासाठी BLA आक्रमक ...