ट्रम्प कॅबिनेटमध्ये Elon Musk आणि परराष्ट्रमंत्र्यांमध्ये खडाजंगी, मस्क वादाच्या भोवऱ्यात
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅबिनेट बैठकीत परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ आणि इलॉन मस्क यांच्यात जोरदार वाद झाला. दोघांमध्ये इतकी जोरदार खडाजंगी झाली की ट्रम्प पाहतच राहिले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या उपस्थितीत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मस्क यांच्यावर खोटे बोलण्याचा आरोप केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅबिनेट बैठकीत परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ आणि इलॉन मस्क यांच्यात जोरदार वाद झाला. दोघांमध्ये इतकी जोरदार खडाजंगी झाली की ट्रम्प पाहतच राहिलेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या उपस्थितीत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मस्क यांच्यावर खोटे बोलण्याचा आरोप केला. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, मस्क आणि रुबिओ यांच्यात कर्मचारी कपातीच्या मुद्द्यावरून वाद झाला होता.
परराष्ट्रमंत्री रुबिओं आणि मस्क यांच्यात हा वाद इतका जोरदार होता की, याची चांगलीच चर्चा रंगली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी आपल्या कॅबिनेट प्रमुखांना सांगितले की, त्यांच्या एजन्सीजमधील स्टाफिंग आणि धोरणाबाबत अंतिम निर्णय मस्क नव्हे तर त्यांचा असेल. खरं तर अलीकडच्या काळात अमेरिकेत मोठ्या प्रमाणात सरकारी यंत्रणांमधील कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे.
अमेरिकेत मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांमध्ये कपात
ट्रम्प आणि त्यांच्या सल्लागारांनी हजारो लोकांना कामावरून काढून टाकले आहे. अमेरिकन नोकरशाही तोडण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून हा प्रकार घडला आहे. विविध विभागातील कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर एकापाठोपाठ एक कठोर आणि मोठे निर्णय घेत आहेत.
नोकऱ्या कपातीबाबत ट्रम्प म्हणतात की, फेडरल सरकारमध्ये अनेक कर्मचारी आहेत. सरकारवर 36 ट्रिलियन डॉलरचे कर्ज असल्याचे त्यांनी नुकतेच म्हटले होते. गेल्या वर्षी कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान झाले होते, त्यामुळे ते दुरुस्त करण्याची गरज आहे.
मस्क-मार्कॉन वादावर ट्रम्प काय म्हणाले?
मात्र, ट्रम्प यांना या घटनेबाबत विचारले असता त्यांनी त्याचा इन्कार केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, असे काहीही घडले नाही. कुठलाही संघर्ष झाला नाही. मी तिथे उपस्थित होतो. मस्क मार्को यांच्यासोबत खूप चांगले वागतात आणि ते दोघेही चांगले काम करत आहेत. “मार्को यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून अविश्वसनीय काम केले आहे आणि इलॉन मस्क एक अद्वितीय व्यक्ती आहेत आणि त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे,” असे ट्रम्प म्हणाले.
झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात जोरदार वाद झाला
अलीकडेच व्हाईट हाऊसमध्ये शांतता प्रस्तावावरून झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात जोरदार वाद झाला होता. यावेळी ट्रम्प यांनी झेलेंस्की यांची जोरदार खिल्ली उडवत आपली वृत्ती तडजोड करणारी नाही, असे म्हटले होते. तुम्ही पुतिन यांचा तिरस्कार करता. आम्ही तुम्हाला 350 अब्ज डॉलर्स दिले आहेत. लष्करी सामुग्री पुरवली जाते. जर आपण लष्करी मदत दिली नसती तर हे युद्ध दोन आठवड्यांत संपले असते. युद्धविराम करण्याचा तुमचा हेतू नाही, असे ट्रम्प म्हणाले. त्याला उत्तर देताना झेलेन्स्की म्हणाले की, आम्हाला हमीसह शस्त्रसंधी हवी आहे.
