Israel-Iran Row : इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये घडामोडींना वेग, इराणचे प्रमुख सुरक्षित स्थळी

इस्रायलने गेल्या आठवड्यात बेरूतमध्ये हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसराल्लाहची हत्या केली. त्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी हसन नसराल्लाह यांना त्यांच्या हत्येचा कट रचण्याचा इशारा दिला होता. इस्रायलच्या हल्ल्यात मारले गेलेल्या नसराल्लाहकडे त्याने आपला एक दूत पाठवला होता. त्याच्या ही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

Israel-Iran Row : इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये घडामोडींना वेग, इराणचे प्रमुख सुरक्षित स्थळी
Follow us
| Updated on: Oct 02, 2024 | 9:36 PM

पश्चिम आशियात तणाव वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी राजधानी तेल अवीव येथे महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत इराणकडून इस्रायलवर डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्र आणि इराणला कसे उत्तर द्यायचे याबाबत चर्चा झाली. इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नेतन्याहू यांनी आज दुपारी सुरक्षा सल्लागारांची चर्चा केली. इस्रायलच्या हवाई दलासह अमेरिकी नौदलाचे विनाशक सक्रिय झाले आहेत. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याबाबत पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले की, इराणने मोठी चूक केली असून त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील.

इराणला गंभीर परिणाम भोगावे लागतील: डॅनियल हगरी

इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) चे प्रवक्ते ॲडमिरल डॅनियल हगारी म्हणाले की, इराणच्या हल्ल्यामुळे तणाव धोकादायक पातळीवर वाढला आहे. याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. आम्ही केव्हा, कुठे आणि कसे प्रतिसाद देऊ. आता यावर इस्रायल सरकार निर्णय घेईल.

इराणने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर दुसऱ्या दिवशी इस्रायलमध्ये घडमोडींना वेग आला आहे. आयडीएफने दक्षिण लेबनॉनमधील २० ते २५ गावांना ताबडतोब घरे सोडण्याचे आवाहन केले आहे. आयडीएफचे प्रवक्ते कर्नल अवचय अद्राई यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “हिजबुल्लाहच्या कारवाया आयडीएफला त्याविरुद्ध कारवाई करण्यास भाग पाडत आहेत. IDF तुम्हाला नुकसान करू इच्छित नाही. तुमच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही ताबडतोब घरे रिकामी करा. जो कोणी हिजबुल्लाह कार्यकर्त्यांच्या जवळ आहे ते स्वत:ला धोक्यात आणू शकतात.

आयडीएफ सैन्याने दक्षिण लेबनॉनमधील जवळपास २५ गावांसाठी हे आदेश जारी केलेत. . ताज्या अपडेटनुसार, IDF ने बुधवारी सांगितले की त्यांनी हवाई हल्ल्यात 150 हून अधिक दहशतवादी संरचना नष्ट केल्या आहेत, ज्यात हिजबुल्ला मुख्यालय, शस्त्रास्त्रे आणि रॉकेट लाँचर्स यांचा समावेश आहे.

खामेनेई यांना सुरक्षित स्थळी हलवले

एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने सांगितले की, खामेनेई शनिवारपासून इराणमध्ये सुरक्षित ठिकाणी राहत होते. मंगळवारी इस्रायलवर सुमारे 200 क्षेपणास्त्रे डागण्याचे आदेश दिल्यानंतर आता ते सुरक्षित स्थळी आहेत. रिव्होल्युशनरी गार्ड्सने एका निवेदनात म्हटले आहे की हा हल्ला नसराल्लाह आणि निलफोरौशन यांच्या मृत्यूचा बदला होता. जुलैमध्ये तेहरानमध्ये हमास नेता इस्माईल हानियाची हत्या आणि लेबनॉनवर इस्रायलच्या हल्ल्याचाही या निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. इस्रायलने हानियाच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....