300 डिजीटल रथ, 7700 सल्ला पेट्या, भाजपकडून प्रचाराला सुरुवात

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रचाराला सुरवात केली आहे. ‘भारत के मन की बात, मोदी के साथ’ या कार्यक्रमाने भाजपच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. भाजप प्रचार कार्यक्रमादरम्यान भारतीय जनतेचे काय विचार आहेत, देशाच्या विकासासाठी त्यांचे सल्ले जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. भाजप आपले संकल्प पत्र तयार करण्याकरिता घरोघरी पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. […]

300 डिजीटल रथ, 7700 सल्ला पेट्या, भाजपकडून प्रचाराला सुरुवात
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रचाराला सुरवात केली आहे. ‘भारत के मन की बात, मोदी के साथ’ या कार्यक्रमाने भाजपच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. भाजप प्रचार कार्यक्रमादरम्यान भारतीय जनतेचे काय विचार आहेत, देशाच्या विकासासाठी त्यांचे सल्ले जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. भाजप आपले संकल्प पत्र तयार करण्याकरिता घरोघरी पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी 300 एलईडी स्क्रिन असलेले रथ तयार केरण्यात आले आहेत.

या कार्यक्रमाच्या रथाला भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी अमित शाह म्हणाले की, ‘देशाची जनता देशासाठी नवी सरकार निवडण्यासाठी सज्ज झाली आहे. 2014 सालाआधी देशाची जी अवस्था होती ती निराश करणारी होती. त्याआधी 30 वर्ष मिश्रित सरकार होती. देशवासीयांच्या मनात अनेक प्रश्न होते. फक्त निवडणूक जिंकण्याकरिता बजेट मांडण्यात येत होतं. यामुळे जनता देशाचा विचार कारायला विसरली आहे’, असा टोमणा अमित शहांनी काँग्रेसला लगावला.

‘ज्यांची सत्ता होती, ते देशाचा विकास करण्यापेक्षा आपली सत्ता वाचवण्यात व्यग्र होते. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा देशाच्या जनतेने पूर्ण बहुमताने सरकार निवडली. आम्ही एकदा पुन्हा देशाच्या जनतेसमोर मत मागायला जात आहोत, आमच्या पक्षात आणि इतर पक्षात खुप मोठा फरक आहे. आम्ही आमच्या पक्षात लोकतंत्र ठेवले आहे, आमचा पक्ष इतर पक्षासारखा वादी पक्ष नाही’, असेही शहा म्हणाले.

या कार्यक्रमाबाबत अमित शहांनी सांगितले, ‘भारत के मन की बात, मोदी के साथ’ हा केवळ एक कार्यक्रम नसून देशातील सव्वा कोटी जनतेच्या मनकी बात आहे. याच आधारे भाजपचं संकल्प पत्र तयार करणार आहे. त्यासाठी आम्ही 10 कोटी लोकांची मत जाणून घेणार आहोत. 1 महिन्याच्या आत हा संपर्क केला जाईल. यासाठी 4 हजार विधानसभेत 7 हजार 700 सल्ला पेट्या लावल्या जाईल. याकरिता प्रत्येक राज्यात 20 लोकांची टीम लोकांचे सल्ले आमच्या पर्यंत पोहचवतील. देशाचे जे सल्ले असतील तेच आमच्या संकल्प पत्रात सामील केले जातील, त्यासाठी आमचे कार्यकर्ते घरोघरी संपर्क करतील, असे शहांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे देखील उपस्थित होते. ‘देशाच्या महिलांसाठी करावं तितकं कमी आहे. आम्ही त्यांच्यासाठी आणखी काय करू शकतो याबाबत आपला सल्ला मागत आहोत. आजपर्यंत ज्या सवर्णांना आरक्षणाचा फायदा मिळाला नाही, त्यांना आम्ही 10 टक्के आरक्षण दिलं. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, त्या काय आहेत हेही आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे राजनाथ सिंह यांनी’, सांगितले.

‘भारत के मन की बात, मोदी के साथ’ या कार्यक्रमासाठी 12 पॅनल बनवण्यात आले आहेत.

1) शेतकरी – शिवराज चौहान 2) युवा खेळूड – राजीव चांदशेखर 3) महिला – स्मृती इराणी 4) अनुसूचित जाती – ठावरसिंग गेहलोत 5) विज्ञात – हर्षवर्धन 6) उद्योग व्यापार – अरुण जेटली 7) इन्फ्रास्ट्रक्चर – हरदीप पुरी 8) शिक्षा – प्रकाश जावडेकर 9) सेना – भूवन चंद्र खंडुरी आणि किरण रिजिजू 10 ) सांस्कृतिक, गंगा, रामजन्मभूमी – महेश शर्मा 11) मजदूर – बंडारू दत्तात्रय

तसेच 6357171717 या क्रमांकावर संपर्क करुनही जनता आपला सल्ला भाजपपर्यंत पोहचवू शकते. 2014 प्रमाणे या निवडणुकीतही सोशल मीडियाचा पुरेपूर उपयोग केला जात आहे. याकरिता www.bharatkemannkibaat.com ही साईट तयार करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर ‘bkmkb2019’ या नावाने नवीन पेज सुरू करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.