नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 145 वर, कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुंबातील 14 जणांचा समावेश

नवी मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत नवी मुंबईत 145 कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या झाली असून चिंतेचे वातावरण (corona patient increase in navi mumbai) आहे.

नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 145 वर, कोरोनाबाधित डॉक्टरच्या कुटुंबातील 14 जणांचा समावेश
Follow us
| Updated on: Apr 27, 2020 | 8:16 PM

नवी मुंबई : नवी मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत नवी मुंबईत 145 कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या झाली असून चिंतेचे वातावरण (corona patient increase in navi mumbai) आहे. रविवारी (26 एप्रिल) महापालिकेस प्राप्त झालेल्या प्रलंबित 164 कोरोना चाचण्यांपैकी 141 अहवाल निगेटिव्ह आले असून 23 जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नवी मुंबईतील करोनाबाधितांची एकूण संख्या 145 झाली (corona patient increase in navi mumbai) आहे.

महापालिकेस रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात 23 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये कोरोनाबधित डॉक्टरच्या कटुंबतील 14 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत आणि एका चॅनेलच्या कॅमेरामन आणि त्याच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे. तसेच कोपरखैराने, नेरुळ, वाशी, घणसोलीमधील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे. हे सगळे कोरोनाबाधित रुग्ण मुंबईच्या हॉटस्पॉटमधून प्रवास करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नवी मुंबईमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

नवी मुंबईत कोरोना चाचणी केलेल्या नागरिकांची संख्या 1955 झाली असून त्यापैकी पॉझिटिव्ह 145, तर निगेटिव्ह 1327 रुग्ण आढळून आले आहेत. 495 रुग्णांचा तपासणी अहवाल प्रलंबित आहे.

नवी मुंबईतील हॉटस्पॉट आणि सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या वाशीनंतर आता बेलापूरमध्येही कोरोना बधितांच्या 2 कुटुंबातील 17 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच महापे एमआयडीसीमध्ये एका आयटी कंपनीमध्ये 19 कोरोना रुग्ण आढळले होते त्यातही आता वाढ झाली आहे. त्याचबरोबर एपीएमसीमधील 2 व्यापारी आणि एका हॉटेल कर्मचाऱ्यांना कोरोना लागण झाल्याने पालिका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने महापालिकेत चिंतेचे वातावरण आहे. महानगरपालिका तर्फे बेलापूर सानपाडा, नेरुळ, सीवूड, कोपर खैराने, वाशी, रबाले, घणसोली इतर परिसरात औषध फवारणी करून 33 क्षेत्रात कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे.

“मुंबईमध्ये काम करणारे आणि नवी मुंबईत राहणारे कर्मचारी कामासाठी रोज प्रवास करत आहेत. त्यामुळे नवी मुंबईत रुग्ण वाढत आहेत. मुंबईमध्ये जे कुणी काम करत आहेत त्यांना राज्य सरकारने तिथे राहाण्याची व्यवस्था करावी नाहीतर नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते”, असं बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले.

नवी मुंबईतील कोरोना रुग्णाचा तपशील खालील प्रमाणे

कोरोना चाचणी केलेल्या नागरिकांची संख्या – 1953

पॉझिटिव्ह रुग्ण – 145

निगेटिव्ह – 1327

प्रलंबित अहवाल – 495

पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह – 27

वाशी येथील कोरोना केअर येथील नागरिक संख्या – 44

इंडियाबुल्समधीर कोरोना केअर नागरिक संख्या – 253

घरात क्वारंटइन असलेल्या व्यक्ती – 3164

क्वारंटइन कालावधीत पूर्ण संख्या – 2408

वाशी येथील कोरोना विशेष रुग्णालयात दाखल रुग्ण – 14

कोरोनामुळे मृत्यूची संख्या – 4

कंटेन्मेंट क्षेत्र – 33

संबंधित बातम्या : 

नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 51 वर, मुंबई एपीएमसीतील मार्केट ‘कोरोना हॉटस्पॉट’च्या वाटेवर?

Corona : नवी मुंबईत 10 जणांपर्यंत कसा पोहोचला कोरोना?

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.