AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी स्वच्छ, मला कशाचीही भीती नाही, ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी ईडीला खुशाल द्यावेत : प्रताप सरनाईक

महाराष्ट्र आणि दिल्लीच्या लढाईत प्रताप सरनाईक यांचा तानाजी मालुसरे झाला आहे. पण मी 21 व्या शतकातला तानाजी मालुसरे आहे, त्यामुळे मी प्रत्येक संकटातून बाहेर येईन, असे वक्तव्य आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

मी स्वच्छ, मला कशाचीही भीती नाही, ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी ईडीला खुशाल द्यावेत : प्रताप सरनाईक
| Updated on: Dec 08, 2020 | 7:39 PM
Share

मुंबई : माझ्यावर कोणताही डाग नाही, मी स्वच्छ आहे, ज्यांच्याकडे माझ्याविरोधात पुरावे असतील त्यांनी ते पुरावे सक्तवसुली संचनलनालयाकडे (ED) खुशाल द्यावेत, मला कोणाचीही भीती नाही, असे वक्तव्य शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे. टॉप्स सिक्युरिटी घोटाळ्याबाबत 24 नोव्हेंबर रोजी ईडीने प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांचे घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर ईडीने त्यांना चौकशीसाठीदेखील बोलावले आहे. याबाबत सरनाईक माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आपण कोणताही गुन्हा/घोटाळा केला नसल्याचे सांगितले. (I am clean, I am not afraid of anything, those who have evidence should give it to ED : Pratap Saranaik)

आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) चौकशीला हजर राहण्यासाठी अधिकाऱ्याकडे वेळ मागितली आहे. तसं पत्र त्यांनी गेल्या आठवड्यात ईडीच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. याबाबत बोलताना सरनाईक म्हणाले की, “टॉप्स सिक्युरिटी असो वा अजून काही काही यात मला कोणतीही भीती नाही, मी स्वच्छ आहे. माझ्यावर एकही डाग नाही, ज्या कुणाकडे पुरावे असतील, त्यांनी ते ED कडे सोपवावेत. मला काहीही फरक पडत नाही. कौटूंबिक कारणास्तव मी ED कडे वेळ मागितला आहे. कुटुंब म्हणून आपल्या काही जबाबदाऱ्या असतात, काही कामेदेखील असतात, त्यासाठी मी वेळ मागितला आहे”.

सरनाईक म्हणाले की, “मी महाराष्ट्रातील एक जबाबदार आमदार आणि जबाबदार नागरिक आहे. त्यामुळे मी ईडीच्या चौकशीला सामोरा जाईन. माझे विजय माल्ल्या किंवा नीरव मोदीसारखे नाही, मी स्वतःहून ED कडे जाईन. तसेच माझा मुलगा विहंग याचा कुठेही उल्लेख नाही. रिमांडमध्ये केवळ प्रताप सरनाईक या एकाच नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे मीडियाने विहंग यांचे नाव घेणे योग्य नाही. मी बाहेरगावी होतो त्यामुळे विहंग याना ED ने नेले”.

महाराष्ट्र आणि दिल्लीच्या लढाईत प्रताप सरनाईक यांचा तानाजी मालुसरे झाला आहे. पण मी 21 व्या शतकातला तानाजी मालुसरे आहे, त्यामुळे मी प्रत्येक संकटातून बाहेर येईन, असे सांगताना हे कॉर्पोरेट वॉर असून माझा राजकीय बळी देण्याचा प्रयत्न झाला, असा दावा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यानी यावेळी केला.

प्रताप सरनाईक आणि त्यांचे चिरंजीव विहंग सरनाईक व पूर्वेश सरनाईक यांनी आज सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना प्रताप सरनाईक यांनी ही प्रतिक्रिया दिली. मी तानाजी मालुसरे सारखा आहे. प्रत्येक संकटातून बाहेर येईल. माझी संपत्ती एवढी मोठी असेल तर त्याचा मला आनंद आहे, असं सांगतानाच पराग शहा, सुधाकर शेट्टी, मंगलप्रभात लोढा, अर्णव गोस्वामी यांची संपत्तीही अमाप आहे, असं ते म्हणाले. अभिनेत्री कंगना रणौतची संपत्ती तपासली का? हिमाचलची पोरगी मुंबईत संपत्ती कमावते. त्याचे काय? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

सरनाईक म्हणाले की, “जे आरोप होताहेत त्यामध्ये मला गोवण्यात आले आहे. सर्वजण म्हणतायत की, 175 कोटींचा घोटाळा आहे. परंतु एवढे मोठे घोटाळे करुन चोर लंडनला जातात. मी कुठेही गेलेलो नाही. ज्यांनी माझ्याशी संपर्क केला, मी त्यांच्याशी बोललो. मी शिवसेनेचा आमदार आहे, मला सेनेने बनवले आहे. मी सेनेत आमदार म्हणून राहीन आणि मी माझी भूमिका ठामपणे मांडेन”.

ईडी सांगेल तेव्हा चौकशीला जाईन

मी रिक्षा चालवायचो. मेहनत करून इथे आलो. जे राजकारण सुरू आहे. ते सर्वांनाच माहीत आहे. ईडी जेव्हा बोलावेल, तेव्हा मी चौकशीला जाईल. हे कॉर्पोरेट वॉर आहे. नेमका हा काय घोळ सुरू आहे, ते मला माहीत नाही. मी पूर्वी जसा होतो, तसाच आताही आहे. फक्त माझ्या पत्नी आणि मुलांना या सर्व प्रकरणात नाहक त्रास देण्यात आला याचं दु:ख आहे, असं सरनाईक म्हणाले.

भाजप विरुद्ध आघाडी लढाई

ही लढाई भाजपविरुद्ध महाविकास आघाडी अशी आहे. त्यात सरनाईक यांचा बळी देण्याचा प्रयत्न झाला. मला कुणी कितीही ऑफर दिली तरी मी शिवसैनिकच राहील. भाजपच्या षडयंत्राला कधीच बळी पडणार नाही, असंही ते म्हणाले. राज्यातील आघाडी सरकार पाच नव्हे 25 वर्षे राहणार असल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

जे होईल ते योग्यच होईल: विहंग

यावेळी विहंग सरनाईक यांनीही मीडियाशी संवाद साधला. जे होईल ते योग्यच होईल. सत्यमेव जयते, अशी प्रतिक्रिया विहंग यांनी व्यक्त केली. माझी पत्नी आजारी असल्याने मी ईडीच्या चौकशीला जाऊ शकलो नाही. मी ईडीला पत्रं लिहून कळवलं होतं. पण तरीही नोटिसा पाठवत राहिले. त्यांनी समन्स बजावले आहे. आम्ही त्याला उत्तर देऊ, असं सांगतानाच काय बरोबर आणि काय चूक हे लोकांनीच ठरवावं असंही ते म्हणाले. (pratap sarnaik slams bjp over ed enquiry)

संबंधित बातम्या:

प्रताप सरनाईक काही साधू संत नाही, नारायण राणेंची ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर-कार्यालयावर ईडीचे छापे, सुपुत्र विहंग सरनाईक चौकशीसाठी ताब्यात

कोण आहेत प्रताप सरनाईक?

(I am clean, I am not afraid of anything, those who have evidence should give it to ED : Pratap Saranaik)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.