मराठा समाज MPSC परीक्षांवरून आक्रमक, मुख्यमंत्र्यांना पत्रातून शेवटचा अल्टिमेटम

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय जाधवांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिती कडक आंदोलनाचाही इशाराही दिला आहे.

मराठा समाज MPSC परीक्षांवरून आक्रमक, मुख्यमंत्र्यांना पत्रातून शेवटचा अल्टिमेटम

पुणे : राज्यात कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेली MPSC परीक्षा पुन्हा लांबणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. कारण जर परीक्षा पुढे ढकलली नाहीतर राज्यभर उग्र आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. 11ऑक्टोबरला राज्यसेवेची पुर्वपरीक्षा होणार आहे. पण त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय जाधवांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिती कडक आंदोलनाचा इशाराही दिला आहे.  (Maratha kranti morcha letter to cm uddhav thackeray to cancel mpsc exam)

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टातून स्थगिती मिळाल्यामुळे परीक्षेची तयारी करणारे राज्यातले मराठी समाजाचे विद्यार्थी नाराज आहेत. त्यांना नेमक्या कुठल्या प्रवर्गात समावेश दिला जाणार आहे याबद्दल अद्याप कुठलीही माहिती नसल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात यावी असं पत्रात लिहिण्यात आलं आहे. जर परीक्षा रद्द झाली नाही तर मराठा समाज राज्यात उग्र आंदोलन करणार असा स्पष्ट इशारा पत्रातून देण्यात आला आहे.

याआधी मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 5 ऑक्टोबरपर्यंत घराबाहेर पडून भूमिका स्पष्ट करावी आणि मराठी आंदोलकांशी संवाद साधावा. अन्यथा येत्या 6 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर आंदोलन करू, असा तीव्र इशारा मराठा आंदोलकांनी दिला होता. मराठा आंदोलकांनी आता थेट मुख्यमंत्र्यांनाच अल्टिमेटम दिल्याने मराठा आंदोलन येत्या काळात आणखीनच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

पत्रात दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेसाठी अर्ज भरताना मराठा उमेदवारांनी एस.ई.बी.सी प्रवर्गातून अर्ज भरले होते. मात्र, आता आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे नेमक्या कुठल्या प्रवर्गात मराठी विद्यार्थी मोडणार याची अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. यासाठी सगळ्यात आधी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी आणि त्यांनतर परीक्षा घेण्यात याव्या असा सल्ला देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या – 

मराठा वकिलांची फौज आंदोलनात हवीच, सरकारला जाब विचारा, कोल्हापुरात संभाजीराजे आक्रमक

…अन्यथा 11 ऑक्टोबरपासून परळीत रोखठोक आंदोलन, मराठा समाजाचा सरकारला इशारा

(Maratha kranti morcha letter to cm uddhav Thackeray to cancel mpsc exam)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI