Maruti Suzuki चा नवा विक्रम, ऑनलाईन चॅनेलच्या माध्यमातून दोन लाखांहून अधिक गाड्यांची विक्री

| Updated on: Nov 16, 2020 | 9:51 PM

मारुती सुझुकी इंडियाने त्यांच्या ऑनलाईन चॅनेलच्या माध्यमातून 2 लाखांहून अधिक कार्सची विक्री केली आहे.

Maruti Suzuki चा नवा विक्रम, ऑनलाईन चॅनेलच्या माध्यमातून दोन लाखांहून अधिक गाड्यांची विक्री
Follow us on

मुंबई : कार्सची निर्मिती करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki India) सोमवारी एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे. कंपनीने त्यांच्या ऑनलाईन चॅनेलच्या माध्यमातून 2 लाखांहून अधिक कार्सची विक्री केली आहे. कंपनीने दोन वर्षांपूर्वी या ऑनलाईन चॅनेलची सुरुवात केली होती. याद्वारे कंपनीने आतापर्यंत संपूर्ण देशात 1000 डिलरशिप्स सुरु केल्या आहेत. (Maruti Suzuki India sells over 2 lakh cars via online channel)

मारुती सुझुकी इंडियाचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव म्हणाले की, आम्ही 2018 मध्ये आमच्या ऑनलाईन चॅनेलची सुरुवात केली होती. तेव्हापासून आमच्या गाड्यांबाबतच्या ऑनलाईन चौकश्यांची (Inquiry) संख्या तीन पटींनी वाढली आहे. तसेच एप्रिल 2019 पासून आतापर्यंत आम्ही दोन लाखांहून अधिक गाड्यांची विक्री केली आहे. तसेच या चॅनेलच्या माध्यमातून 21 लाखांहून अधिक Inquiry आल्या आहेत.

गुगल ऑटो गियर शिफ्ट इंडिया 2020 च्या रिपोर्टचा हवाला देत श्रीवास्तव म्हणाले की, भारतातील 95 टक्के ग्राहक वाहन खरेदी करण्यापूर्वी ऑनलाईन माहिती घेतात. वेगवेगळ्या गाड्यांच्या किंमती आणि फिचर्सची तुलना करुन पाहतात. त्यानंतर कोणते वाहन खरेदी करायचे ते ठरवतात. ऑनलाईन माहिती घेतल्यानंतर ग्राहक विश्वासू डिलरकडे जातात आणि त्यानंतरच वाहन खरेदीबाबतची प्रक्रिया सुरु होते.

श्रीवास्तव म्हणाले की, ज्या ग्राहकांनी डिजिटल चॅनेलच्या माध्यमातून वाहनाची माहिती घेतली आहे, अशा ग्राहकांनी 10 दिवसांच्या आता कार खरेदी केली आहे. यावरुन एक गोष्ट स्पष्ट होते की, ग्राहकांचा आमच्या ऑनलाईन चॅनेलवर अधिक विश्वास आहे. तसेच डिजिटल इन्क्वायरीच्या मदतीने ग्राहक शोरुमपर्यंत पोहोचतोय.

श्रीवास्तव म्हणाले की, आमचा हायपर-लोकल प्लॅटफॉर्म ग्राहकांना डिलर्सशी कनेक्ट करण्यात समर्थ ठरला आहे. 2017 मध्ये आम्ही ऑनलाईन बुकिंगला सुरुवात केली होती. त्यामुळे आतापर्यंतच्या सेलमध्ये 20 टक्के वाढ झाली आहे. तसेच गेल्या पाच महिन्यांचा विचार केला तर ऑनलाईन बुकिंग्समध्ये गेल्या पाच महिन्यात 33 टक्के वृद्धी पाहायला मिळाली आहे.

संबंधित बातम्या

Crash Test : क्रॅश टेस्टमध्ये मारुती, टाटा आणि महिंद्राच्या ‘मेड इन इंडिया कार’ पास की नापास?

जुन्या गाडीच्या बदल्यात नवी गाडी घेऊन जा; सरकारकडून विशेष सूट

(Maruti Suzuki India sells over 2 lakh cars via online channel)