बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडून नवा चेहरा?

| Updated on: Nov 15, 2020 | 2:40 PM

भाजपचे ज्येष्ठ नेते प्रेम कुमार यांनी उपमुख्यमंत्रिपदासाठी दावा सादर केल्याने शर्यत रंगली आहे

बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडून नवा चेहरा?
Follow us on

पाटणा : बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडून नवा चेहरा दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी (Sushilkumar Modi) यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. प्रेम कुमार, कामेश्वर चौपाल यांची नावं शर्यतीत आहेत. (Sushil Kumar Modi unlikely to become next Bihar Deputy Chief Minister)

बिहारमध्ये सत्तास्थापनेच्या घडामोडी आणि बैठकांचे सत्र सुरु आहे. नितीशकुमार यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. नितीश कुमार सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. उद्या (सोमवार 16 नोव्हेंबर) दुपारी 11:30 ते 3 वाजण्याच्या दरम्यान शपथविधी होण्याची शक्यता आहे.

सुशील कुमार मोदी यांनी जवळपास 13 वर्षे बिहारमध्ये उपमुख्यमंत्रिपद भूषवले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ते उपमुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी जवळीक असल्याने सुशीलकुमार मोदींची वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Sushil Kumar Modi unlikely to become next Bihar Deputy Chief Minister)

दुसरीकडे, विधीमंडळ दलाच्या बैठकीपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रेम कुमार यांनी उपमुख्यमंत्रिपदासाठी दावा सादर केला. आपण 50 वर्षांपासून पक्षाची सेवा करत आहोत. पक्ष जी काही जबाबदारी देईल, ती आपण स्वीकारु, मात्र उपमुख्यमंत्रिपदाची संधी मिळावी, असं प्रेम कुमार म्हणाले. ते सलग आठव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. नितीशकुमार यांच्या नेतृत्वात मागील सरकारमध्ये त्यांच्याकडे कृषी मंत्रालय होते.

भाजपला अधिक मंत्रिपदं मिळण्याची चिन्हं

नितीशकुमारांच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान देण्यात येईल, याची चर्चा सुरु झाली आहे. भाजप एनडीएतील सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे मंत्रिमंडळात भाजपच्या कोट्यातून 18 ते 20 मंत्री केले जाऊ शकतात. त्याचबरोबर जेडीयूच्या कोट्यातून 12-14 मंत्री केले जाऊ शकतात. याशिवाय हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि व्हीआयपी या पक्षांना प्रत्येकी एक मंत्रीपद दिलं जाण्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या

बिहारमध्ये राजकीय हालचाली वाढल्या; मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस

देवेंद्र फडणवीस एनडीएच्या बैठकीसाठी पाटण्याला, बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अधिकृत निर्णय होणार

(Sushil Kumar Modi unlikely to become next Bihar Deputy Chief Minister)