Nashik : करन्सी नोट प्रेसच्या आवारात आग, वाळलेल्या गवतामुळे भडका?
नाशिकमधील (Nashik) करन्सी प्रेसच्या आवारात आग लागली आहे. करन्सी प्रेसमध्ये (Currency Note Press) नोटा (Note) छापल्या जातात. दरम्यान, प्रेसच्या आवारात असलेल्या गवताला आग लगल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
नाशिकमधील (Nashik) करन्सी प्रेसच्या आवारात आग लागली आहे. करन्सी प्रेसमध्ये (Currency Note Press) नोटा (Note) छापल्या जातात. दरम्यान, प्रेसच्या आवारात असलेल्या गवताला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नाशिक रोड परिसरात ही करन्सी प्रेस आहे. या आगीच्या माहितीने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दुपारी तीन ते चारदरम्यान अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. देशभरात वापरात येणाऱ्या चलनी नोटा याठिकाणी छापल्या जातात. त्यामुळे अत्यंत संवेदनशील असा हा परिसर आहे.
Published on: Mar 31, 2022 04:26 PM
Latest Videos
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात

