Maharashtra News LIVE Update | पूरग्रस्तांच्या मदतीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत ठोस निर्णय नाही

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | पूरग्रस्तांच्या मदतीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत ठोस निर्णय नाही
Breaking News

| Edited By: चेतन पाटील

Jul 28, 2021 | 10:25 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 28 Jul 2021 07:35 PM (IST)

  पूरग्रस्तांच्या मदतीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत ठोस निर्णय नाही

  मंत्रिमंडळात पूरग्रस्तांना मदतीबाबत चर्चा झाली, एनडीआरएफच्या नियमांनुसार मदत करण्याचा निर्णय झाला आहे, त्यानुसार तात्काळ 10 हजारांची मदत देण्याचा निर्णय झाला, संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर पूरग्रस्तांना मदत जाहीर केली जाईल, अशी प्रतिक्रिया मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

 • 28 Jul 2021 07:26 PM (IST)

  मंत्रिमंडळाच्या बैठकीत शालेय शुल्क 15 टक्के कमी करण्याचा निर्णय, वर्षा गायकवाड यांची माहिती

  शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

  “मंत्रिमंडळाच्या बैठकीत शालेय शुल्क 15 टक्के कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राजस्थानच्या सर्वोच्च न्यायालयात जी केस आहे त्यामध्ये जे निकष ठेवले आहेत तेच निकष राज्यात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या निर्णय घेतला आहे. बाकीच्या काही गोष्टींबाबत येणाऱ्या काळात निर्णय घेण्यात येईल. या वर्षीच्या फीमध्ये 15 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा निर्णय घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार निर्णय घेण्यात आला आहे”, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

 • 28 Jul 2021 06:21 PM (IST)

  जयंत पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, प्रकृती अस्वस्थ असल्याने रुग्णालयात दाखल

  मुंबई : जयंत पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

  मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून पाटील हॉस्पिटलमध्ये रवाना

  प्रकृती अस्वस्थ असल्याने रुग्णालयात दाखल

 • 28 Jul 2021 06:02 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात 294 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ 

  पुणे कोरोना अपडेट

  दिवसभरात 294 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

  - दिवसभरात 347 रुग्णांना डिस्चार्ज

  - पुण्यात करोनाबाधीत 9 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 2

  -224 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

  - पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 486365

  - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2488

  - एकूण मृत्यू-9749 .

  -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 475128

 • 28 Jul 2021 04:22 PM (IST)

  मला मुद्दाम अडकवले जात आहे, गहना वशिष्ठचा दावा

  मुंबई : मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गहना वशिष्ठ आली मीडियासमोर

  मी राज कुंद्राच्या समर्थनार्थ बोलत आहे, त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

  मला मुद्दाम अडकवले जात आहे आणि माझे नाव मुद्दाम एफआयआरमध्ये घेतले जात असल्याचा केला आरोप

  गुन्हे शाखेने मला अटक केली तेव्हा पासून 5 महिने झाले

  तेव्हा ही पीडित मुलगी कोठे होते ? त्यावेळी ती का समोर आली नाही ? अस प्रश्न गहना हिने केला आहे

 • 28 Jul 2021 12:07 PM (IST)

  पुणे शहरातील दुकाने, हॉटेल्सच्या वेळ वाढण्यासंदर्भात आज निर्णय होणार?

  पुणे -

  - शहरातील दुकाने, हॉटेल्सच्या वेळ वाढण्यासंदर्भात आज निर्णय होणार ?

  - दुकाने सायंकाळी ७ वाजेपर्यंत परवानगी मिळणार का, हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार का, याबाबतच्या निर्णयाकडे लक्ष,

  - पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करण्याचे सूतोवाच केले होते,

  - शहरात १५ जूनपासून दुकाने आणि हॉटेल्स सायंकाळी चार वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचा आदेश राज्य सरकारने दिला होता, त्याला आता महिना उलटून गेला आहे. तरीही निर्णयात बदल झालेला नाही.

 • 28 Jul 2021 12:06 PM (IST)

  कोरोनामुळे थांबलेल्या अवयवदानामुळे मराठवाड्यात 310 रुग्ण भोगतायेत मरण यातना

  औरंगाबाद -

  कोरोनामुळे थांबलेल्या अवयवदानामुळे मराठवाड्यात 310 रुग्ण भोगतायेत मरण यातना..

  मराठवाड्यात 264 जणांना हवीय किडनी तर 46 जणांना हवंय यकृत..

  कोरोनामुळे दीड वर्षापासून थांबले अवयवदान..

  अवयव प्रत्यारोपनासाठी हॉस्पिटल सज्ज मात्र अवयव दानाची संख्या घटली..

  रुग्ण मरण यातना सहन करत काढतायेत डायलिसिसवर दिवस

 • 28 Jul 2021 12:05 PM (IST)

  राज्य सरकारच्या पंडित भीमसेन जोशी कोरोना रुग्णालयात काम करणारे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भिख मांगो आंदोलन

  मीरा भाईंदर -

  राज्य सरकारच्या पंडित भीमसेन जोशी कोरोना रुग्णालयात काम करणारे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भिख मांगो आंदोलन

  कोविड रुग्णालया समोर हातात वाडगं घेऊन भिख मांगो आंदोलन..

  चार महिने पासून पगार नसल्याने कर्मचारी रुग्णालचं मुख्य प्रवेश द्वारच्या समोर अनोख्या पद्धतीने भिख मांगो आंदोलन करत आहे..

  कर्मचाऱ्यांच्या आरोप आहे की कोरोना काळात आपल्या जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णालयात काम करत आहेत परंतु चार महिने पासून पगार नाही मिळत आहे.

 • 28 Jul 2021 10:37 AM (IST)

  माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या प्रकृतीत सुधारणा

  सोलापूर -

  माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या प्रकृतीत सुधारणा

  सकाळी व्हेंटिलेटर ही काढले आहे

  कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत

  गणपतराव देशमुख  यांचे पुत्र चंद्रकांत देशमुख यांची टी. व्ही.9 मराठीला  माहिती

 • 28 Jul 2021 10:37 AM (IST)

  सराईत वाहन चोरट्यास भोसरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

  पिंपरी चिंचवड

  -52 वर्षीय सराईत वाहन चोरट्यास भोसरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या; तब्बल एक कोटी एक लाखाचा मुद्देमाल जप्त

  -सुनिल वामन महाजन,वय 52असे अटक केलेल्या सराईत वाहन चोराचे नाव आहे.

  -त्याच्याकडून 22 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच चोरीच्या दुचाकी खरेदी करणा-या आणि त्याची वाहतूक करणाऱ्या चौघांवर कारवाई करत तीन ट्रॅव्हल्स बस देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत

  -दारूच्या व्यसनापोटी करत होता वाहन चोरी

  -या कारवाईमध्ये एकूण एक कोटी एक लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. यामुळे 14 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत

  -ह्या गुन्ह्यातील एका वाहन चोरी करत असतानाची घटना जवळ असलेल्या सीसीटीव्ही कैद

 • 28 Jul 2021 10:36 AM (IST)

  लातूरच्या माळूमब्रा गावात कोरोनाचे 20 रुग्ण आढळले

  लातूर -

  जिल्ह्यातल्या माळूमब्रा गावात कोरोनाचे 20 रुग्ण आढळले, 750 लोकसंख्या असलेलं गाव, गावात आरोग्य पथक दाखल.

 • 28 Jul 2021 10:12 AM (IST)

  शिवसेनेचे माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल

  औरंगाबाद -

  शिवसेनेचे माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल

  भाजप पदाधिकाऱ्यास मारहानीच्या तक्रारीनंतर माजी उपमहापौर यांच्याविरोधात गुन्हा दाखल..

  माजी उपमहापौर यांच्यासह 8 ते 10 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा जवाहर पोलीस ठाण्यात दाखल..

  लसीकरणावरून भाजप पदाधिकारी तथा माजी नगरसेविकेच्या पतीला मारहाण केल्याचा भाजपने केला होता आरोप..

  भाजप पदाधिकारी गोविंद केंद्रे यांची प्रकृती स्थिर..

 • 28 Jul 2021 09:34 AM (IST)

  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

  कोल्हापूर

  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

  कोल्हापूर शहर, शिरोळ तालुक्याला देणार भेट

 • 28 Jul 2021 09:34 AM (IST)

  भाजपचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

  भाजपचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत

  फडणवीसांसोबत प्रवीण दरेकरही दौऱ्यावर

  लोकांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवणार असल्याची माहिती

  लोकांचा रोष, सरकारने मदत करावी, अशी मागणी फडणवीसांनी केली

 • 28 Jul 2021 09:29 AM (IST)

  राज ठाकरेंचा तीन दिवस पुणे दौरा

  पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा तीन दिवस पुणे दौरा,

  पुण्यातील 9 विधानसभा मतदारसंघाचा घेणार आढावा,

  उद्या सकाळी 9 वाजता नवी पेठेतील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात शाखाध्यक्षांच्या घेणार मुलाखती,

  एक दिवसात तीन मतदारसंघाचा आढावा , तीन दिवसांत 9 मतदारसंघ,

  राज ठाकरे नवीन शाखाध्यक्षांच्या करणार नियुक्त्या, स्वतः साधणार संवाद,

 • 28 Jul 2021 09:10 AM (IST)

  सोलापुरातील कोरोना रुग्णसंख्या अधिक असलेली गावे सील करण्यात येणार

  सोलापूर - कोरोना रुग्णसंख्या अधिक असलेली गावे आता सील करण्यात येणार

  पंढरपूर सांगोला करमाळा तालुक्यात रुग्ण संख्येत सातत्याने होत आहे वाढ

  3  तालुक्यात शेजारच्या जिल्ह्यातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात येत जा

  ग्रामीण भागातील नियमावली आणखीन कडक करण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार

  शहरातील रुग्णसंख्या  आटोक्यात आली असली  ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग  सुरूच

 • 28 Jul 2021 09:09 AM (IST)

  पारनेर तालुक्यात तहसीलदार ज्योती देवरे यांची धडक कारवाई

  अहमदनगर

  पारनेर तालुक्यात तहसीलदार ज्योती देवरे यांची धडक कारवाई

  बाभूळवाडे येथे कोरोना चाचणी करण्यास आलेल्या आरोग्य विभागाच्या पथकाला पाहून अनेक नागरिक डोंगराकडे पळाले

  मात्र तहसीलदार आणि आरोग्य विभागाच्या पथकाने नागरिकांना थेट डोंगरावर पकडून कोरोना चाचणी केली

  जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण संख्या पारनेर मध्ये आढळत असल्याने तहसीलदार देवरे यांची धडक मोहीम

  तर डोंगरावर पळून जाणाऱ्यांमध्ये काही जण पॉझिटिव्ह आढळून आले

 • 28 Jul 2021 08:38 AM (IST)

  नागपूर जिल्ह्यात  डेंग्यू आजाराचे रुग्ण वाढले

  नागपूर जिल्ह्यात  डेंग्यू आजाराचे रुग्ण वाढले

  जिल्ह्यात डेंग्यू आजाराचे 374 रुग्ण आढळले असून, यामध्ये ग्रामीण भागात 212 तर शहरातील 162 रुग्णांचा समावेश आहे.

  बालकांमध्ये आधाकून येत आहे डेंग्यूचे रुग्ण

  डेंग्यूच्या नियंत्रणासाठी महानगरपालिका तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणेने तत्काळ उपाययोजना करण्यासोबतच लोकजागृतीला प्राधान्य द्यावे,

  असे निर्देश यावेळी विभागीय आयुक्तांनी दिलेत.

  डेंग्यू नियंत्रणासंदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनांचा दैनंदिन अहवाल सादर करण्यासंदर्भातही संबंधित यंत्रणांना  सूचना देण्यात आल्या.

 • 28 Jul 2021 08:37 AM (IST)

  जळगाव शहरातील जुने बस स्थानक परिसरात असणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

  जळगाव शहरातील जुने बस स्थानक परिसरात असणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

  धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर भादू महाजन यांच्यासह इतरांवर कारवाई केल्याने खळबळ

  ९ जणांना ताब्यात घेण्यात आले असून रोख रक्कम व वाहने मिळून ७ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

 • 28 Jul 2021 08:37 AM (IST)

  नाशिक रोडच्या मालधक्का परिसरात चारचाकी वाहनाची तोडफोड

  नाशिक -

  नाशिक रोडच्या मालधक्का परिसरात चारचाकी वाहनाची तोडफोड

  गाडीच्या काचा फोडून दहशत पसरवण्याचा प्रयत्न..

  काही दिवसांपूर्वी देखील चार ते पाच वाहनांची झाली होती तोडफोड..

  नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

  पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी

 • 28 Jul 2021 08:36 AM (IST)

  जळगाव जिल्हा बँकेने आरबीआयच्या निर्देशानुसार 12 लाख खातेदारांच्या खाते क्रमांक अचानक बदलले

  जळगाव -

  जळगाव जिल्हा बँकेने आरबीआयच्या निर्देशानुसार 12 लाख खातेदारांच्या खाते क्रमांक अचानक बदलले

  खाते क्रमांक बदलण्याची कुठलीही सूचना शेतकऱ्यांना नाही

  माहिती बँकेने न दिल्याने शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप

 • 28 Jul 2021 07:45 AM (IST)

  खासदार भावना गवळीविरोधात हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका

  - खासदार भावना गवळीविरोधात हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका

  - बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड कारखान्याच्या विक्रीचं प्रकरण

  - सरकारी नियम धाब्यावर बसवत कारखाना विक्रीत कोट्यवधीचा घोळ केल्याचा आरोप

  - या प्रकरणात भावना गवळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची याचिकेत मागणी

  - शिवसेनेचे माजी नगरसेवक हरीश सारडा यांनी दाखल केली याचिका

 • 28 Jul 2021 07:45 AM (IST)

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील 29 जुलैपासून होणार पदवी परीक्षांना सुरुवात

  औरंगाबाद -

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील 29 जुलैपासून होणार पदवी परीक्षांना सुरुवात

  पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा 29 जुलैपासून ऑनलाइन पद्धतीने होणार सुरू..

  मार्च-एप्रिल 2021 च्या परीक्षांचे करण्यात नियोजन, कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षा ऑनलाइन..

  29 जुलै पासून बीए,बीएस्सी आणि बीकॉम द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या परीक्षाना होणार सुरुवात..

  10 ऑगस्टपासून प्रथम वर्षाच्या तर 20 ऑगस्ट पासून होणार व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा..

 • 28 Jul 2021 07:41 AM (IST)

  औरंगाबाद शहरात पुन्हा एकदा लस टंचाई

  औरंगाबाद ब्रेकिंग :-

  औरंगाबाद शहरात पुन्हा एकदा लस टंचाई

  आज शहरात फक्त 1260 लसींचे डोस शिल्लक

  दुसरा डोससाठी प्रतीक्षेत असणाऱ्यांची संख्या पोचली लाखाच्या घरात

  तर पहिला डोस घेण्यासाठी अजूनही नागरिकांची वणवण सुरू

  दर दिवसाआड संपतायत लसींचे डोस

  लसींचे डोस मिळत नसल्यामुळे प्रशासनही झाले हतबल

 • 28 Jul 2021 07:05 AM (IST)

  सोलापुरात आज गर्भवती महिलांसाठी लसीकरण मोहीम

  सोलापूर -

  शहरात आज गर्भवती महिलांसाठी होणार लसीकरण मोहीम

  सकाळी दहा ते पाच या वेळेत महानगरपालिकेच्या पाच लसीकरण केंद्रावर होणार लसीकरण

  प्रत्येक लसीकरण केंद्रावर 50 गर्भवती महिलांचे होणार लसीकरण

 • 28 Jul 2021 07:04 AM (IST)

  कॉटन, टेरीटॉवेल चादरीच्या  दरात 15 टक्के निवड

  सोलापूर -

  कॉटन, टेरीटॉवेल चादरीच्या  दरात 15 टक्के निवड

  यंत्रमागावर उत्पादित होणाऱ्या 100% कॉटन, टेरीटॉवेल आणि चादरीच्या दरात किलोमागे 15 टक्के वाढ करण्याचा निर्णय

  मागील काही दिवसांपासून सुताच्या दरात सातत्याने दरात होत आहे वाढ

  त्याबरोबर रंग रसायने आणि वेष्टणनच्या दरात झाली आहे वाढ

  कच्चामाल महागल्याने दरात वाढ करण्याचा उत्पादकांनी घेतला निर्णय

  यंत्रमागधारकांनी गेल्या वर्षभरात तीन वेळा पक्या मालाच्या दरात केली वाढ

 • 28 Jul 2021 07:02 AM (IST)

  नाशिक शहरात आज पाणीपुरवठा बंद

  नाशिक शहरात आज पाणीपुरवठा बंद

  आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीचा भाग म्हणून आज पाणी नाही

  उद्या सकाळपासून शहरात नियोजित वेळेनुसार पाणी

  गंगापूर धरणात 75 टक्के पाणीसाठा होई पर्यंत सुरू राहणार पाणी कपात

 • 28 Jul 2021 06:55 AM (IST)

  राज्यात गेल्या 24 तासात 6,258 कोरोनाबाधितांची वाढ

  राज्यात गेल्या 24 तासात 6,258 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व नवीन 12,645 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 60,58,751 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 82,082 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.54% झाले आहे.

 • 28 Jul 2021 06:52 AM (IST)

  उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या 114 शिक्षकांच्या जागा रिक्त

  उस्मानाबाद -

  उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या 114 शिक्षकांच्या जागा रिक्त

  उस्मानाबाद जिल्ह्यात वृक्षारोपण मोहीम थंडावली , 1 कोटी 40 लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट असताना केवळ 13 लाख झाडांची लागवड

Published On - Jul 28,2021 6:39 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें