ST Strike | आधीच दीर्घ आजार त्यात आंदोलनाचा धसका, अकोल्यात एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

| Updated on: Nov 14, 2021 | 5:38 PM

अकोला जिल्हातल्या अकोटमध्ये ST कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घढली. संतोष रजाणे असं कर्मचाऱ्यांचं नाव असून दीर्घ आजाराने त्यांचा मृत्यू झालाय. मागील आठ दिवसांपासून बस डेपोसमोर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु होते.

ST Strike | आधीच दीर्घ आजार त्यात आंदोलनाचा धसका, अकोल्यात एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
सांकेतिक फोटो
Follow us on

अकोला : अकोला जिल्हातील अकोटमध्ये ST कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घढली. संतोष रजाने असं कर्मचाऱ्याचं नाव असून दीर्घ आजाराने त्यांचा मृत्यू झालाय. मागील आठ दिवसांपासून बस डेपोसमोर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रजाणे मानसिक तणावाखाली असल्याचे सांगण्यात येतेय.

आंदोलनाचा धसका, उपचारादरम्यान मृत्यू

अकोला जिल्हातील अकोट बसस्थानकावर संतोष रजाने (43 वर्षे) मागील अनेक वर्षांपासून कर्तव्यावर होते. ते दीर्घ आजाराने त्रस्त होते. गेल्या 15 दिवसांपासून वाहक संतोष रजाने यांची प्रकृती खालावली होती. प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पालघरमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सध्या राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. कर्मचारी संपावर असल्यामुळे बसफेऱ्या बंद आहेत. राज्यभर या आंदोलनाचा लोण पसरलेले आहे. अशीच एक घटना पालघर जिल्ह्यात घडली. जव्हार बस डेपोतील एका बस कंडक्टरने (वाहक) आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. 13 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती. दीपक खोरगडे (वय वर्षे 30) असे बस कंडक्टरचे नाव होते. खोरगडे यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

86 हजार एसटी कर्मचारी संपावर

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची दाहकता किती असावी याचे अंदाज बांधले जात होते. मुंबईत आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांनी तळ ठोकलेला आहे. तर राज्यात कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय. राज्यभर बसफेऱ्या थांबलेल्या आहेत. या पार्श्वभमूमीवर एसटी महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांची आकडेवारी 13 नोव्हेंबर रोजी जारी केली होती. या संपात एकूण 86 हजार 568 कर्मचारी सहभागी झालेआहेत. यामध्ये 36 हजार 758 चालक तर 27 हजार 23 वाहक आहेत.

इतर बातम्या :

VIDEO: फडणवीस म्हणाले, शिवसेनेला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद दिलं नाही ही चूक होती; विक्रम गोखलेंच्या दाव्याने खळबळ

PMAY-G लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी, आता 15 नोव्हेंबरला जन राष्ट्रीय गौरव दिवस साजरा होणार

Bhai Jagtap | पेट्रोल, गॅस दरवाढीवरुन काँग्रेस आक्रमक, ‘स्मृती इराणी कुठे आहेत ?’ भाई जगताप यांचा सवाल