AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: सुनील पाटील भाजपशी निगडीत, राष्ट्रवादीशी संबंध नाही, पाटीलचं आडनावही खोटं; अनिल गोटेंच्या दाव्यांनी खळबळ

आर्यन खान प्रकरणात सुनील पाटील यांच्या एन्ट्रीमुळे नवा ट्विस्ट आला आहे. सुनील पाटील यांचा राष्ट्रवादीशी संबंध असल्याचा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेला असतानाच माजी आमदार अनिल गोटे यांनी या प्रकरणात नवा दावा केला आहे. (sunil patil is not ncp's worker, says anil gote)

VIDEO: सुनील पाटील भाजपशी निगडीत, राष्ट्रवादीशी संबंध नाही, पाटीलचं आडनावही खोटं; अनिल गोटेंच्या दाव्यांनी खळबळ
anil gote
| Edited By: | Updated on: Nov 07, 2021 | 5:13 PM
Share

धुळे: आर्यन खान प्रकरणात सुनील पाटील यांच्या एन्ट्रीमुळे नवा ट्विस्ट आला आहे. सुनील पाटील यांचा राष्ट्रवादीशी संबंध असल्याचा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेला असतानाच राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल गोटे यांनी या प्रकरणात नवा दावा केला आहे. सुनील पाटील यांचा राष्ट्रवादीशी संबंधित नाहीत. ते भाजपशीच निगडीत आहेत. सुनील पाटील यांचं पाटील हे आडनावही खरं नाही, असा दावा अनिल गोटे यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल गोटे यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना हा दावा केला आहे. सुनील पाटील हे राष्ट्रवादीत कधीच नव्हते. त्यांचा एखाद्या नेत्याशी संबंध असू शकेल. एखाद्याचे अनेक नेत्यांशी संबंध असू शकतात. 2012-13 मध्ये त्यांनी दहीहंडीचं आयोजन केलं होतं. त्या दहीहंडीला 11 लाखांचे बक्षीस लावले होते. त्यापूर्वी कोणीच एवढं बक्षीस लावलं नव्हतं. ही दहीहंडी अॅरेंज करणारे सर्व लोक भाजपचे होते. आजही आहेत. आमचा काय संबंध त्यांच्याशी? या प्रकरणात चारही बाजूने भाजप अडचणीत आली आहे. त्यामुळे कुणावर तरी ढकलायचं म्हणून ते आमचं नाव घेत आहेत, असं गोटे म्हणाले.

धुळ्यात टनाने गांजा, वानखेडे आलेच नाही

सुनील पाटील यांचं खरं आडनाव पाटील नाही. त्यांचं खरं आडनाव चौधरी आहे. इथले जे गुंड आहेत. त्यांच्याशी यांचे संबंध आहेत. एक ग्राम… दहा ग्राम… शंभर ग्राम गांजा सापडला म्हणून अख्खा देश डोक्यावर घेतला जात आहे. अरे इथे तर शिरपूरला टनाने गांजा होता. 1500 एकर शेतीत गांजा लावला होता. त्यात 500 एकर जमीन ही वनखात्याची होती. याच समीर वानखेडेंकडे त्याची मी तक्रार केली होती. लेखी तक्रार केली होती. दोन वेळा बोललोही त्यांच्याशी. तेव्हा वानखेडे इथे का आले नाही? कारण इथे सेलिब्रिटी नव्हती ना? पब्लिसिटी मिळाली असती, पण इतकी मोठी मिळाली नसती म्हणून वानखेडे आले नाहीत, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. मी तुम्हाला आजही 1500 एकर जमिनीवर गांजा लावला होता त्याचे व्हिडिओ देऊ शकतो, फोटो देऊ शकतो आणि त्याचं संभाषणही देऊ शकतो, असंही त्यांनी सांगितलं.

राज्य सरकारचा संबंधच नाही

धुळ्यात टनाने गांजा होता याबाबत तुम्ही राज्य सरकारकडे तक्रार का केली नाही? असा सवाल गोटे यांना करण्यात आला. त्यावर, राज्याचा याच्याशी संबंध येत नाही. हा प्रश्न पूर्णपणे एनसीबीचा आहे. म्हणून त्यांच्याकडे तक्रार केली. मी त्यांना माझ्या व्हॉट्सअॅपवरून सर्व मटेरियल पाठवलं, पण कारवाई झाली नाही, असं ते म्हणाले.

गांजा पिणारे आत, पिकवणारे बाहेर

आताही धुळ्यात मोठ्या प्रमाणावर गांजा सापडतो. त्यावेळी दोन ट्रक गांजा होता. पण कोणीही कारवाई केली नाही. गांजा प्यायला त्याला दोषी धरतात. शंभर ग्राम गांजा ठेवला त्याला दोषी धरतात. पण टनाने गांजा पिकवतात त्याला दोषी धरत नाही अशी विचित्रं अवस्था आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. एखाद्या व्यक्तीला ड्रग्ज घेताना पकडलं असेल तर त्याला नशामुक्ती केंद्रात पाठवायचं हा नियम आहे. त्यात नवीन काहीच नाही, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

तो तेरा बेटा लंबा जायेगा… शाहरुख खानलाही घाबरवण्याचा प्रयत्न; नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट

व्हिलन तुरुंगात जात नाही तोपर्यंत पिक्चर सुरूच राहणार; नवाब मलिक यांचा इशारा

अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार, ईडीची हायकोर्टात धाव, न्यायालयीन कोठडीला चॅलेंज

(sunil patil is not ncp’s worker, says anil gote)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.