AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वनप्रेमींना बिबट्या सफारीचा आनंद मिळणार ? कुठे असणार प्रकल्प ?

बिबट्या सफारीची संकल्पनेनंतर प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरु झाल्या. त्यासाठी आंबेगव्हाण येथे जागा वन विभागाद्वारे निश्चित केली गेली.

वनप्रेमींना बिबट्या सफारीचा आनंद मिळणार ? कुठे असणार प्रकल्प ?
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Mar 05, 2023 | 10:27 AM
Share

पुणे : मानव-बिबट्या संघर्ष राज्यातील अनेक भागत आहे. विदर्भातील अनेक ठिकाणी बिबट्या व मानव (Leopard Human Clash) यांच्यात संघर्ष होतो. नाशिकमध्ये बिबट्याची धाव शहराकडे अनेकवेळा घेतली गेली आहे. तसेच पुणे जिल्ह्यात बिबटे आहेत. मग या बिबट्याशी संघर्ष करण्याऐवजी मैत्री झाली तर…बिबट्या सफारीच्या (Leopard Safari) आनंद मिळाला तर…पुणे जिल्ह्यात त्या द्दष्टिने पावले पडत आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे बिबट्या सफारीसाठी प्रयत्न सुरु आहे. आता सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यासाठी (Budgetary Provision) तरतूद होण्याची दाट शक्यता आहे. याबाबतचे सूतोवाच वन विभागातील अधिकाऱ्यांनी केले आहे.

कुठे आहेत बिबटे

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर या तालुक्यांमध्ये बिबटे आहे. तसेच नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, श्रीगोंदा आणि पारनेर या तालुक्यांमध्ये बिबटे आहेत. हे बिबटे अनेक वेळा मानवी वस्तीत येऊन धडकतात. यामुळे मानवी मृत्यूंसह पशुधनाचा देखील मृत्यूच्या घटना घडतात. या भागांतील उसाच्या शेतात हे बिबटे असतात. मानवी वस्तीपर्यंत आलेल्या या बिबट्यांना एकत्र करत बिबट्या सफारीची संकल्पना मांडली गेली. माजी आमदार शरद सोनवणे यांनी २०१८ मध्ये प्रथम ही कल्पना मांडली होती.

प्रशासकीय पातळीवर हालचाली

बिबट्या सफारीची संकल्पनेनंतर प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरु झाल्या. त्यासाठी आंबेगव्हाण येथे जागा वन विभागाद्वारे निश्चित केली गेली. या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार झाला आहे. या आराखड्यानुसार सफारीसाठी अर्थसंकल्पात तरतुदीची होणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारने जुन्नर बिबट्या सफारीच्या डीपीआरसाठी तरतूद करून तो अंतिम केला आहे. आता या डीपीआरसाठी येत्या अर्थसंकल्पात मोठ्या निधीच्या तरतुदीची अपेक्षा जुन्नरकरांना आहे.

यापूर्वी काय झाले

मागील अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थ व नियोजनमंत्री अजित पवार यांनी बारामती येथील बिबट्या सफारीसाठी ६० कोटींच्या निधीची तरतूद केली. यामुळे जुन्नरची बिबट्या सफारी बारामतीला पळवल्याचा आरोप करत माजी आमदार शरद सोनवणे यांनी उपोषण केले होते. परंतु आता ९ मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात तरतूद होण्याची शक्यता आहे.

देशात 12 हजार बिबटे

देशभरात 12 हजार बिबटे आहेत. त्यापैकी मध्य प्रदेशात सर्वाधिक बिबटे आढळून आले आहेत. मध्य प्रदेशात 3421 बिबटे आढळून आले आहेत. तर देशभरातील इतर राज्यांपैकी महाराष्ट्रात 1690, कर्नाटकमध्ये 1783 इतके बिबटे आढळून आले आहेत. बिबट्यांची ही मोजणी कॅमेरा ट्रॅपिंगच्या(Camera Trapping) माध्यमातून करण्यात येते.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.