दीपाली चव्हाणांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही; ठाकरे सरकारमधील मंत्र्याचं आश्वासन

दीपाली चव्हाण यांचा मृत्यू हा धक्कादायक आणि दुःखदायक आहे. | Deepali Chavan

दीपाली चव्हाणांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही; ठाकरे सरकारमधील मंत्र्याचं आश्वासन
दीपाली चव्हाण
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 2:35 PM

इंदापूर: दीपाली चव्हाण यांच्या मृत्यूसाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांना कडक शासन केले जाईल, असे वक्तव्य राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. दीपाली चव्हाण यांचा मृत्यू हा धक्कादायक आणि दुःखदायक आहे. दीपाली चव्हाण (Deepali Chavan) यांची ओळख धडाडीच्या महिला अधिकारी म्हणून होती. दीपाली चव्हाण यांच्या मृत्यू जे जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर ती निश्चित प्रकारे कारवाई केली जाईल, असे दत्तात्रय भरणे यांनी म्हटले. (NCP leader Dattatray Bharane on Deepali Chavan suicide)

ते शनिवारी इंदापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत 128 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले.

‘नितीन राऊतांनी वीजतोडणीची भूमिका थोडी लवचिक ठेवली पाहिजे’

यावेळी दत्तात्रय भरणे यांनी राज्यातील वीज तोडणी मोहीम थोडी लवचिक ठेवावी, अशी विनंती उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली. सध्या शेतकरी आर्थिक संकटात आहे, शेतकऱ्याला अडचण आहे. त्यामुळे हा विषय थोडा लवचिक करा. जेणेकरून शेतकऱ्यांना थोड़ा दिलासा होईल. शेतकऱ्यांना विज बिलाचे हप्ते पाडून दया, अशी माझी विनंती आहे. याबाबत उर्जामंत्री सकारात्मक विचार करतील, असा आशावाद दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.

शिवकुमारला ताब्यात द्या, महिला आक्रमक

वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर (RFO Deepali Chavan Suicide) शेकडो महिलांनी पोलिस ठाण्यात धडक दिली. आरोपी शिवकुमारला ताब्यात देण्याची मागणी यावेळी संतप्त महिलांनी केली. महिला आक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी मानवी साखळी करून आरोपीला कोर्टात हजर केले. दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवकुमारला धारणी न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल येथे वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर दबंग कामगिरी बजावत असलेल्या दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून दीपाली चव्हाण यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. त्यांनी लिहिलेल्या सुसाईट नोटमधून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

शिवकुमारला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

दरम्यान दीपाली चव्हाण यांच्या आईने आरोपी शिवकुमारला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. वनविभागाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राज्यभरातून होत आहे. विनोद शिवकुमार याचं निलंबन करुन श्रीनिवास रेड्डी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा दीपाली चव्हाण यांच्यावर मोरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी चव्हाण कुटुंबाचे सांत्वन करुन श्रद्धांजली वाहिली.

संबंधित बातम्या :

साताऱ्याची दीपाली, मेळघाटात वनअधिकारी, स्वत:वर गोळी झाडली, हादरवणारी सुसाईड नोट जशीच्या तशी

ना भान, ना बोलण्याची तमा, कथित अधिकाऱ्यासोबत दीपाली चव्हाण यांचं संभाषण

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.