भारतीयांपुढे सर्वात भयंकर संकट, जगणंही होणार कठीण? चिंता वाढली!
एप्रिल महिन्यात महागाईची सर्वाधिक झळ उर्जा आणि इंधनावर पाहायला मिळाली. धातू उद्योगालाही झळ बसत आहे. अॅल्यूमिनियम, कॉपर यासारखे धातू यांची किंमत वाढली आहे.

Inflation In India : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जग हतबल झाले आहे. भारतालाही या युद्धाची झळ बसत आहे. गेल्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेलची किंमत चांगलीच वाढली आहे. सोबतच गॅस सिलिंडर, सीएनजीची किंमतदेखील वाढत आहे. यामुळे सामान्य जनता होरपळत आहे. दुसरीकडे घाऊक महागाई दर 8.3 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. हा महागाई द गेल्या तीन वर्षांतील सर्वकालिक उच्च स्तरावर आहे. दरम्यान, ही परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यात फक्त पेट्रोल, डिझेल नव्हे तर अन्य अनेक वस्तू महागण्याची शक्यता या या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत? ते जाणून घेऊ या….
पेट्रोल, डिझेल भडकले आता…
बँक ऑफ बडोदाच्या एका रिपोर्टनुसार पश्चिम आशियात असाच तणाव कायम राहिला आणि परिस्थिती पूर्ववत न झाल्यास पेट्रोल आणि डिझेलचा भाव आणखी वाढू शकतो. याचा थेट परिणाम सामान्यांच्या रोजच्या जीवनार होणार आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी यांच्यासह इतरही अनेक गोष्टी महाग होऊ शकतात. यात रोजच्या वापरताली बऱ्याच वस्तूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे सध्याच्या बिकट परिस्थितीत यंदा मान्सून अनुकूल न राहिल्यास भारतात परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. त्यामुळे भविष्यात पालेभाज्या, दूध, अंडी, मांस, मासे हे खाद्यपदार्थ महाग होऊ शकतात.
एप्रिल महिन्यात नेमकं काय घडलं?
एप्रिल महिन्यात महागाईची सर्वाधिक झळ उर्जा आणि इंधनावर पाहायला मिळाली. धातू उद्योगालाही झळ बसत आहे. अॅल्यूमिनियम, कॉपर यासारखे धातू यांची किंमत वाढली आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे आता उत्पादनाचा खर्चही वाढला आहे. मशिनरी, टेक्स्टाईल, केमिकल, औषध उद्योगांनाही याची झळ बसत आहे. त्यामुळे भविष्यात उत्पादन मूल्य वाढण्याची शक्यता आहे.
म्हणून काटकसरीने राहण्याचा संदेश
दुसरीकडे अमेरिका-इराण युद्धामुळ जागतिक पातळीवर अस्थिरता निर्माण झाली आहे. परिणामी भारताचा रुपया कमजोर होत आहे. भारताच्या रुपयाची ही घसरण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे महागाई वाढतच जाण्याची शक्यता आहे. हीच परिस्थिती लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांनी काटकसरीने वागावे असे आवाहन केले आहे.