
आचार्य चाणक्यांनी (Chanakya Niti) त्यांच्या अनुभवावरुन अनेक गोष्टी सांगितल्या. आचार्य चाणक्यांनी अनेक वर्षापूर्वी सांगितलेल्या गोष्टी आजच्या जीवनातही लागू होतात. या गोष्टी अंगीकारून माणूस आजही आपला काळ बदलू शकतो. आचार्यांचे त्यावेळचे अनुभव आजच्या काळातही उपयुक्त ठरतात.

देवाने तुम्हाला जी काही विशेष गुणवत्ता दिली आहे, ती तुम्ही वाढवली पाहिजे आणि कोणतीही प्रतिभा सुधारण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सराव. सतत प्रयत्न केलेल्या तुम्हाला येत असणाऱ्या गोष्टीमध्ये तुम्हा परंगत होता.

ज्याप्रमाणे प्राप्त केलेले ज्ञान सरावाने वाढवता येते, त्याचप्रमाणे चांगल्या वागणुकीने वडिलधाऱ्यांचा मान राखला जातो आणि चांगल्या गुणांनी सन्मान राखला जातो. आयुष्यात कधीही या गोष्टी कधीही विसरू नये.

चाणक्य नीतीनुसार वासनेसारखे कोणतेही दुष्कर्म नाही आणि क्रोधासारखी आग नाही. हे दोन्ही असे दुर्गुण आहेत, जे माणसाला पूर्णपणे उद्ध्वस्त करतात. त्यांच्यापासून दूर राहणे आपल्या हिताचे आहे.

नेहमी इतरांची काळजी घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला लोकांच्या दु:खाची ओळख होईल. त्यामुळे तुम्हाला तुमचे दु:ख कमी वाटेल.