
आदिल खान आणि सोमी यांनी मार्च महिन्यात लग्न केलं. लग्नानंतर मे महिन्यात आदिल आणि सोमी हनीमूनसाठी गेले. सध्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

स्विमिंग पूलमध्ये आदिल खान आणि सोमी यांचा रोमान्स सध्या चर्चेचा विषय आहे. कारण राखी रुग्णालयात असताना आदिल याने फोटो पोस्ट केले आहेत.

आदिल खान एक श्रीमंत उद्योजक आहे. राखी हिला देखील आदिल याने अनेक महागड्या भेटवस्तू दिला. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही.

राखी हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर आदिल याने 'बिग बॉस 12' स्पर्धक सोमी खान हिच्यासोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

सोमी खान हिने अनेक मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. 'केसरिया बालम' आणि 'हमारा हिंदूस्तान' यांसारख्या मालिकांमध्ये सोमी हिने महत्त्वाची भूमिका साकराली आहे.