दारुच्या बाटल्या काचेच्याच का असतात? आतापर्यंत कोणीही सांगितलं नसेल तुम्हाला कारण

दारू किंवा वाईनसाठी प्लास्टिकऐवजी काचेच्या बाटल्या का वापरल्या जातात? यामागील शास्त्रीय कारणे, रासायनिक अभिक्रिया (Leaching) आणि चवीवर होणारा परिणाम याबद्दल सविस्तर माहिती या लेखात वाचा.

| Updated on: May 09, 2026 | 2:27 PM
1 / 6
आपण अनेकदा पाहिलं असेल की बाजारात पाणी, कोल्ड्रिंक्स किंवा इतर खाद्यपदार्थ प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये सहज उपलब्ध असतात. पण जेव्हा विषय दारु किंवा वाईनचा असतो, तेव्हा जगभरात सर्वत्र काचेच्या बाटल्या वापरल्या जातात. यामागे केवळ फॅशन नसून एक मोठं शास्त्रीय कारणं दडलेले आहे.

आपण अनेकदा पाहिलं असेल की बाजारात पाणी, कोल्ड्रिंक्स किंवा इतर खाद्यपदार्थ प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये सहज उपलब्ध असतात. पण जेव्हा विषय दारु किंवा वाईनचा असतो, तेव्हा जगभरात सर्वत्र काचेच्या बाटल्या वापरल्या जातात. यामागे केवळ फॅशन नसून एक मोठं शास्त्रीय कारणं दडलेले आहे.

2 / 6

तज्ज्ञांच्या मते, अल्कोहोल हे एक 'सॉल्व्हेंट' (द्रावक) म्हणून काम करते. जर ते प्लास्टिकच्या बाटलीत दीर्घकाळ ठेवले, तर ते प्लास्टिकमधील रसायनांशी अभिक्रिया करू शकते. या प्रक्रियेमुळे प्लास्टिकमधील घटक दारूमध्ये विरघळतात, ज्याला विज्ञानाच्या भाषेत 'लीचिंग' म्हणतात. यामुळे पेयाची शुद्धता नष्ट होऊन ते आरोग्यास घातक ठरू शकते. काच ही रासायनिकदृष्ट्या पूर्णपणे निष्क्रिय असल्याने त्यात कोणताही धोका उद्भवत नाही.

3 / 6

दारू किंवा वाईनची खरी किंमत तिच्या विशिष्ट चवीवर आणि सुगंधावर अवलंबून असते. प्लास्टिकमधून हवेचा अतिसूक्ष्म शिरकाव होण्याची शक्यता असते. यामुळे ऑक्सिडीकरण होऊन पेयाची चव बिघडू शकते. याउलट, काचेच्या बाटल्या हवा बंद (Airtight) राहतात, ज्यामुळे वर्षांनुवर्षे पेयाचा मूळ दर्जा टिकून राहतो.

4 / 6

बहुतेक दारूच्या बाटल्या या गडद तपकिरी किंवा हिरव्या रंगाच्या असतात. सूर्याच्या अतिनील (UV) किरणांपासून पेयाचे संरक्षण करणे हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. प्लास्टिकमध्ये अशा प्रकारचे संरक्षण देण्याची क्षमता काचेच्या तुलनेत कमी असते.

5 / 6

काच ही १०० टक्के पुनर्वापर योग्य असते. पण प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे प्रदूषण होते, म्हणून काचेला प्राधान्य दिले जाते. काचेच्या बाटल्या पेयाला एक प्रीमियम दर्जा आणि वजन देतात, ज्यामुळे ग्राहकांना उच्च गुणवत्तेचा अनुभव मिळतो.

6 / 6

थोडक्यात सांगायचे तर, सुरक्षितता, चव आणि दीर्घकाळ टिकण्याची क्षमता या त्रिसूत्रीमुळेच दारूसाठी काचेच्या बाटल्यांचा पर्याय सर्वोत्तम मानला जातो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us