AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : संविधान बदलण्याची चर्चा, प्रचारावर देवेंद्र फडणवीस यांचं थेट, स्पष्ट उत्तर

Devendra Fadnavis : विरोधी पक्षांकडून, पुन्हा तिसऱ्या टर्ममध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यास संविधान बदलल जाईल, असा प्रचार सुरु आहे. त्याविषयी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट, स्पष्ट उत्तर दिलं.

Devendra Fadnavis : संविधान बदलण्याची चर्चा, प्रचारावर देवेंद्र फडणवीस यांचं थेट, स्पष्ट उत्तर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 15, 2024 | 11:40 AM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपाचा जाहीरनामा काल प्रसिद्ध झाला. भाजपाकडून याला संकल्प पत्र म्हटलं जात. त्या विषयी आज भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली व त्यातले बारकावे समजून सांगितले. “भाजपाचा जाहीरनामा ही मोदींची गॅरेंटी आहे. भाजपाचा जाहीरनामा सर्व घटकांना समर्पित आहे” असं फडणवीस म्हणाले. सरकारी नोकऱ्या किती देणार? हा मुद्दा जाहीरनाम्यात आलेला नाही. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ‘जेवढ्या जागा रिकाम्या आहेत, त्या सगळ्या भरण्याचा निर्धार आहे’ असं उत्तर दिलं. “काँग्रेसचा जाहीरनामा हा अपयशी आहे. काँग्रेसने छत्तीसगड, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमध्ये विजय मिळवला होता. पण जाहीरनाम्यातील एकही गोष्ट पूर्ण केली नाही. आता कर्नाटकात निवडून आले, तरी जाहीरनाम्यातील एकही गोष्ट पूर्ण केलेली नाही.

काँग्रेससासठी जाहीरनामा एक कागद आहे. आमच्यासाठी मोदींची गॅरेंटी आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “मल्लिकार्जुन खरगे यांनी देशाच सोडून द्यावं, ते कर्नाटकातून येतात. काँग्रेस अध्यक्ष आहेत. कर्नाटकात तुम्ही दिलेली आश्वासन पूर्ण करु शकला नाहीत. आश्वासन पूर्ण करण्यासाठी नसतात, असं तुमची लोक म्हणतात” अशा शब्दात फडणवीसांनी खरगेंवर निशाणा साधला. संविधान बदलण्याच्या मुद्दावर देखील फडणवीस यांनी भाष्य केलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच संविधान होतं, म्हणून चहा विकणाऱ्याचा मुलगा देशाचा पंतप्रधान झाला. एनडीएचा प्रमुख म्हणून मोदींची निवड झाली, त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम संविधानाची पूजा केली. त्यानंतर पद स्वीकारलं. कुठल्याही ग्रंथापेक्षा संविधान महत्त्वाच असल्याच त्यांनी म्हटलं. मागची दहावर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यांनी संविधानाच रक्षण केलं. संविधान बदलण्याचा विचार केला नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

संविधानाबद्दल सुप्रीम कोर्टाने काय म्हटलय?

“सगळ्यात महत्त्वाच म्हणजे, सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलय की, संविधानाच बेसिक स्ट्रक्चर बदलण्याचा अधिकार संसदेला नाही. हा काँग्रेसचा जुमला आहे. ज्यावेळी विकासाचा विचार मांडता येत नाही. ज्यावेळी कुठलही जनहिताच कार्य करता येत नाही. विश्वासहर्ता संपलेली असते. अशावेळी लोकांच्या मनात कनफ्युजन निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. 2014, 2019 आणि आता 2024 मध्येही काँग्रेसचा तोच प्रयत्न आहे. पण लोकांचा विश्वास मोदींवर आहे. तीन राज्यात मोदींच्या बाजून कौल दिला. आता सुद्धा जनता मोदींच्या बाजूने मतदान करेल” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला