Supriya Sule News : सुप्रिया सुळेंनी केली स्वारगेटच्या बसस्थानकाची पाहाणी, म्हणाल्या..
Pune Swargate Crime News : स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वारगेट बसस्थानक परिसराची पाहाणी केली. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून आज पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकाची पाहाणी करण्यात आलेली आहे. याठिकाणी 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर ही पाहाणी सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सरकार लाडक्या बहिणींबद्दल एवढं बोलतं. मग या प्रकरणात सत्ताधारी मंत्र्यांनी जे वक्तव्य केले ते योग्य आहेत का? पीडित मुलगी घाबरलेली होती. ती देखील कोणाच्यातरी घरातली मुलगी आहे, तिच्याबद्दल असे वक्तव्य करणे कोणालाही शोभत नाही. मुख्यमंत्र्यांनी जो चाप ओएसडी आणि त्यांच्या पीएनबद्दल लावला आहे, तोच त्यांच्या मंत्र्यांबद्दल देखील लावावा हीच आमची अपेक्षा आहे. राज्यात महिलांवर होणारे अत्याचार वाढले आहेत. गुन्हेगारी वाढली आहे. रक्षा खडसे यांच्या मुलीवर सुरक्षा रक्षक सोबत असताना देखील जो अत्याचार झाला, राज्यात सातत्याने अशा घटना होत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हंटलं आहे.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा

