बोम्मईंना हटवा, राज्यपालांना हटवा, दिल्लीत संसदेच्या प्रांगणात ठाकरे गटाचा आवाज

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्यासह अन्य 8 सदस्यांना श्रद्धांजली वाहून संसदेचं हिवाळी अधिवेशन दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.

बोम्मईंना हटवा, राज्यपालांना हटवा, दिल्लीत संसदेच्या प्रांगणात ठाकरे गटाचा आवाज
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 07, 2022 | 12:06 PM

नवी दिल्लीः कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्याविरोधात आज दिल्लीत तीव्र आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्रातील ठाकरे गटाच्या खासदारांनी (Shivsena Thackeray MP) संसदेच्या प्रांगणात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जोर-जोरात घोषणाबाजी केली.

बोम्मई को हटादो… भगत सिंह कोश्यारी को हटादो, अशा घोषणा ठाकरे गटाच्या खासदारंनी दिल्या. यावेळी खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत हे उपस्थित होते.

आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राज्यसभेत आज ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर स्थगन प्रस्ताव मांडलाय. तो मान्य होतो की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दोन्ही राज्यात भाजपची सत्ता असतानाही हा वाद निर्माण केला जातोय. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे राज्यसभेत सीमा प्रश्नाबाबत चर्चा व्हावी अशी मागणी चतुर्वेदी यांनी केली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री जे वक्तव्य करत आहेत, त्याला भाजपचा पाठिंबा आहे, असा खासदार चतुर्वेदी यांचा आरोप आहे. अमित शहा यांना शिंदे गटाचे खासदार भेटतील पण अमित शहा काय करणार आहेत? शहा यांचा पाठिंबा आहे म्हणूनच हा वाद निर्माण झाला आहे, असा आरोप चतुर्वेदी यांनी केलाय. सभागृहात चर्चा झाली नाही तर आम्ही प्रसंगी आंदोलन करू अशा इशारा त्यांनी दिलाय.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्यासह अन्य 8 सदस्यांना श्रद्धांजली वाहून संसदेचं हिवाळी अधिवेशन दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.