सोलापुरात भाजपला घरचा अहेर, तुरुंगातील भाजप सदस्याचा राष्ट्रवादीला पाठिंबा

| Updated on: Jan 14, 2020 | 10:38 PM

जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत समविचारी पक्षाच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार झटका देणाऱ्या भाजपला आज (14 जानेवारी) त्यांच्याच लोकांनी घरचा आहेर दिला.

सोलापुरात भाजपला घरचा अहेर, तुरुंगातील भाजप सदस्याचा राष्ट्रवादीला पाठिंबा
Follow us on

सोलापूर : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत समविचारी पक्षाच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार झटका देणाऱ्या भाजपला आज (14 जानेवारी) त्यांच्याच लोकांनी घरचा आहेर दिला (Solapur ZP president elections). पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर जिल्हा परिषद गटाचे भाजप सदस्य गोपाळ अंकुशराव यांनी विषय समितीच्या सभापती निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केलं. गोपाळपूर गटाचे भाजप सदस्य गोपाळ अंकुशराव हे सध्या पुण्यातील तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. मात्र, आज न्यायालयाच्या आदेशानुसार मोठ्या पोलीस बंदोबस्तात ते विषय समिती सभापतीच्या निवडीला हजर राहिले (Solapur ZP president elections).

सोलापूर जिल्हा परिषदेमधील चार सभापती निवडीची मतदान प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज पार पडली. यात गोपाळ अंकुश राव यांनी आपली चारही मतं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापच्या उमेदवाराला दिली. विशेष म्हणजे भाजपचा सदस्य रुक्मिणी ढोले यांनी निवडणूक प्रक्रियेला दांडी मारल्याने त्याचाही जबरदस्त फटका भाजपला बसला. त्यामुळे भाजप आणि समविचारीचे अध्यक्ष-उपाध्यक्ष असले, तरी तीनही विषय समितीचे सभापतीपद हे महाविकास आघाडीकडे गेलं आहे. तर एक सभापतीपद चिट्ठीद्वारे भाजप आणि समविचारी आघाडीकडे आले आहे.

भाजप आणि समविचारीमध्ये असलेल्या मतांची तफावत आज कमी झाली होती. त्यातच भाजपाचे सदस्य गोपाळ अंकुशराव यांनी राष्ट्रवादीला मतदान केलं, तर भाजपा सदस्य रुक्मिणी ढोले यांच्या सभेला दांडी मारल्यामुळे भाजपने आपली हक्काची मते गमावली. त्यामुळे जिल्हा परिषदमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची खिचडी पाहायला मिळेल.

पाहा व्हिडीओ :