IPL 2021: पंजाब किंग्सचा दीपक हुडा एका फोटोमुळे अडचणीत, BCCI करणार चौकशी, काय आहे ही पोस्ट?

दीपक हुडा 21 सप्टेंबर रोजी राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात खास कामगिरी करु शकला नाही. त्यानंतर आता सामन्यापूर्वीच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे तो अडचणीत सापडला आहे.

IPL 2021: पंजाब किंग्सचा दीपक हुडा एका फोटोमुळे अडचणीत, BCCI करणार चौकशी, काय आहे ही पोस्ट?
दीपक हुडा
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 4:39 PM

दुबई: मंगळवारी (21 सप्टेंबर)  पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात अत्य़ंत अटीतटीचा सामना झाला. पण या सामन्यापूर्वी पंजाबचा ऑलराउंडर खेळाडू दीपक हुडा (Deepak Hooda) याने केलेल्या एका सोश मीडिया पोस्टमुळे तो अडचणीत सापडला आहे. बीसीसीआयच्या (BCCI) की अँटी करप्शन यूनिटकडून या पोस्टची चौकशी होणार आहे.

पंजाब आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात एका क्षणी राजस्थानने सामना गमावलाच असे वाटत असताना अखेरच्या षटकात चमत्कार व्हावा तशी राजस्थानच्या कार्तिक त्यागीने (Kartik Tyagi) गोलंदाजी केली. पंजाबला विजयासाठी आवश्यक 4 धावा रोखत कार्तिकने 2 विकेटही घेतले. ज्यामुळे अगदी पंजाबच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. या पराभवामुळे दीपकवरही टीका केली जात आहे. कारण मोक्याच्या क्षणी अगदी सामना हातात असतान दीपक शून्यावर बाद झाला होता. दरम्यान सामन्यापूर्वी  त्याने केलेल्या एका पोस्टमुळे अँटी करप्शन गायडलाइन्सचं उल्लंघन झालं असून बीसीसीआयच्या नियमांचंही उल्लघंन या पोस्टमुळे झालं आहे. त्यामुळे दीपक आणखी अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काय आहे ही पोस्ट?

दीपक अडचणीत सापडलेली पोस्ट दीपकच्याच फोटोची आहे. दीपक या फोटोत पंजाब संघाची जर्सी घालून हेल्मेट चढवत आहे. ज्याला त्याने कॅप्शन दिलं आहे की, ‘आम्ही येतोय पंजाब किंग्स. पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स. आयपीएल 2021. आपलं पंजाब.’ ही पोस्ट त्याने 21 सप्टेंबरला दुपारी दोन वाजता केली. सामना सुरु होण्याआधी बराच काळ ही पोस्ट त्याने केली होती. ज्यामुळे या पोस्टमधून तो प्लेयिंग 11 अर्थात सामन्यात खेळणाऱ्या अंतिम 11 खेळाडूमध्ये असल्याचं समोर येत होतं. दरम्यान हे आयपीएल आणि बीसीसीआयच्या नियमांविरुद्ध असल्याने त्याची चौैकशी होणार आहे.

आयपीएलवर पुन्हा कोरोनाचं संकट

कोरोनाच्या संकटामुळे मे महिन्यात स्थगित झालेली इंडियन प्रिमीयर लीग (IPL 2021) नुकतीच 19 सप्टेंबरपासून पुन्हा सुरु झाली आहे. पण सुरुवातीचे तीन सामने होताच एक मोठं संकट पुन्हा आय़पीएलसमोर उभ येऊन ठाकलं आहे. कोरोना महामारीने पुन्हा एकदा आयपीएलमध्ये शिरकाव केला आहे. सनरायजर्स हैद्राबाद संघाचा (SRH) खेळाडू आणि भारताचा गोलंदाजा टी नटराजन याला कोरोनाची बाधा झाली आहे (T Natrajan Corona Positive). महत्त्वाचं म्हणजे आजच हैद्राबाद संघाचा दिल्ली कॅपिटल्सशी सामना (SRH vs DC) होणार आहे. पण त्यापूर्वीच ही बातमी समोर आली आहे.

हे ही वाचा

मोठी बातमी: IPL मध्ये कोरोनाचा शिरकाव, सनरायजर्स हैद्राबाद संघाचा खेळाडू कोरोनाबाधित, 6 जण विलगीकरणात

इंग्लंडचा पाकिस्तान दौरा रद्द झाल्याचा IPL ला फायदा, चेन्नई सुपरकिंग्सचा संघ सर्वात आनंदी

IPL 2021: कार्तिक त्यागीने पंजाबच्या तोंडचा घास हिरावला, अखेरच्या षटकात राजस्थानचा रोमहर्षक विजय

(Cricketer deepak hooda trap in Controversy for instagram post before match against rajsthan royals)

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....