AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Aus : Team india ऑस्ट्रेलियावर उलटवू शकते बाजी, स्पिन बॉलिंगबरोबर ‘हे’ दोन फॅक्टर घडवू शकतात चमत्कार

IND vs AUS 3rd Test : हा कसोटी सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला तीन कामं कराव लागतील. हे तीन फॅक्टर इंदोरमध्ये टीम इंडियासाठी चमत्कार करु शकतात. चेतेश्वर पुजाराने दुसऱ्याडावात अर्धशतक झळकवलं.

Ind vs Aus : Team india ऑस्ट्रेलियावर उलटवू शकते बाजी, स्पिन बॉलिंगबरोबर 'हे' दोन फॅक्टर घडवू शकतात चमत्कार
| Updated on: Mar 03, 2023 | 9:21 AM
Share

IND vs AUS 3rd Test :टीम इंडिया इंदोरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामना जिंकू शकते. बॉर्डर-गावस्कर सीरीजमधला हा तिसरा कसोटी सामना आहे. हा कसोटी सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला तीन कामं कराव लागतील. हे तीन फॅक्टर  इंदोरमध्ये टीम इंडियासाठी चमत्कार करु शकतात. चेतेश्वर पुजाराने दुसऱ्याडावात अर्धशतक झळकवलं. मात्र, तरीही टीम इंडिया नाथन लियॉनच्या फिरकीच्या जाळ्यात अडकली. 64 धावात त्याने 8 विकेट काढल्या. टीम इंडियाचा दुसरा डाव 163 धावात आटोपला. ऑस्ट्रेलियाला आज कसोटीच्या तिसऱ्यादिवशी विजयासाठी फक्त 76 धावांची गरज आहे.

हरणारी मॅच जिंकू शकते टीम इंडिया

ऑस्ट्रेलिया आज विजयी लक्ष्य गाठून जून महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करेल. स्पिनला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर टीम इंडियाच काही चाललं नाही. एकटा चेतेश्वर पुजारा (59) सोडल्यास, कोणीही खेळपट्टीवर टिकून लियॉनचा सामना केला नाही. नाथन लियॉनने या सामन्यात 99 धावा देऊन 11 विकेट काढल्या. पुजाराशिवाय श्रेयस अय्यरने (26) धावा केल्या. भारतीय फलंदाजांनी खराब फटक्यांची निवड केली.

या तीन फॅक्टरकडे विजयाची ‘चावी’

जडेजा, अश्विन आणि अक्षर

इंदोर टेस्टमध्ये टीम इंडियाला हरणारी मॅच जिंकायची असेल, तर दुसऱ्याडावात रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेलची फिरकी चालली पाहिजे. ऑस्ट्रेलियाने वर्ष 2020 मध्ये एडिलेड कसोटीच्या दुसऱ्याडावात टीम इंडियाला 36 रन्सवर ऑलआऊट केलं होतं. टीम इंडियाला अशीच कमाल दाखवावी लागेल. इंदोर टेस्टच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट फक्त 11 धावात गमावल्या होत्या.

अतिरिक्त धावा रोखणं गरजेच

इंदोर कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 22 एक्स्ट्रा धावा दिल्या. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या डावात 9 बाय, 8 लेग बाय आणि 5 नो बॉलच्या रुपात एक्स्ट्रा रन्स दिल्या. दुसऱ्याडावात टीम इंडियाला अशा चूका टाळाव्या लागतील. अन्यथा अर्ध्यातासात मॅच संपेल. DRS चा हुशारीने वापर

इंदोर टेस्टच्या पहिल्या डावात टीम इंडियाने DRS चा वापर केला. पण अनेकदा अपयश आलं. या टर्निंग पीचवर काही ना काही होणारच. टीम इंडियाला दुसऱ्याडावात हुशारीने DRS चा वापर करावा लागेल. पहिल्या डावात टीम इंडियाने आपले तीन रिव्यू गमावले होते.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.