AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final 2023 मध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया मग फायनल इंग्लंडमध्ये का? जाणून घ्या कारण!

IND vs AUS : सर्वांना असा प्रश्न पडला आहे की फायनलमध्ये तर इंडिया आणि ऑस्ट्रेलियाने स्थान मिळवलं मग फायनल मॅच इंग्लंड मध्ये नेमकी कोणत्या कारणामुळे खेळण्यात येत आहे.

WTC Final 2023 मध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया मग फायनल इंग्लंडमध्ये का? जाणून घ्या कारण!
| Updated on: Jun 06, 2023 | 11:19 PM
Share

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल 2023 सामन्यांमध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ एकमेकांना भिडणार आहेत. उद्या होणाऱ्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा आणि टीम इंडियाचा संघ मोठ्या आत्मविश्वासाने मैदानात उतरतील. मात्र सर्वांना असा प्रश्न पडला आहे की फायनलमध्ये तर इंडिया आणि ऑस्ट्रेलियाने स्थान मिळवलं मग फायनल मॅच इंग्लंड मध्ये नेमकी कोणत्या कारणामुळे खेळण्यात येत आहे.

नेमकं काय आहे कारण?

डब्ल्यूटीसीचा फायनल सामना फक्त इंग्लंडमध्येच का खेळवला जात आहे. याचं एक कारण म्हणजे डब्ल्यूटीसीमधील पहिल्या 3 फायनल फक्त इंग्लंडमध्येच घेण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. यापैकी एक फायनल झाली आहे जी 2021 मध्ये खेळवली गेली होती. आता ही दुसरी फायनल आहे. यानंतर 2025 मध्येही फायनल मॅच  इंग्लंडमध्ये होणार आहे.

इंग्लंडमधील लोकांना कसोटी क्रिकेट पाहायला खूप आवडतं. कोणत्याही संघाचा सामना असो, ते पाहण्यासाठी ते मैदानावर जातात. इंग्लंडचा संघ खेळतो की नाही याचा त्यांना फारसा फरक पडत नाही. इंग्लंडमधील लोक कसोटी क्रिकेटचा खूप आदर करतात. या सर्व कारणांमुळे इंग्लंड योग्य आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दोन्ही संघ

WTC Final साठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.