‘..पण इतिहास चुकीचा होता’, वीरेंद्र सेहवागचं शिवजयंतीला खास ट्विट

भारताचा धडाकेबाज माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने छत्रपतींना अभिवादन करणारं खास ट्विट केलं आहे. | Virendra Sehwag Tributes Chhatrapati shivaji maharaj

'..पण इतिहास चुकीचा होता', वीरेंद्र सेहवागचं शिवजयंतीला खास ट्विट
विरेंद्र सेहवागचं छत्रपतींना अभिवादन...
Follow us
| Updated on: Feb 19, 2021 | 3:39 PM

मुंबई :  संपूर्ण राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह ओसांडून वाहत आहे. कोरोनाचं सावट असलं तरी शिवभक्तांध्ये जयंतीचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. विविध नेते, अभिनेते, खेळाडू छत्रपतींना अभिवादन करणारे ट्विट करत आहेत. भारताचा धडाकेबाज माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने छत्रपतींना अभिवादन करणारं खास ट्विट केलं आहे तसेच राजेंची महती ट्विटमधून विषद केली आहे. (Virendra Sehwag Tributes Chhatrapati shivaji maharaj On His Jayanti)

वीरेंद्र सेहवागने शिवछत्रपतींच्या जयंतीदिनी खास ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये सेहवागने म्हटलंय, “इतिहास आपल्याला सांगतो की शक्तिशाली लोक शक्तिशाली स्थळांवरुन येतात. पण इतिहास चुकीचा होता! सामर्थ्यवान लोक शक्तिशाली स्थळं बनवतात…”

छत्रपती शिवरायांना माझं वंदन… जय माँ भवानी, असा नाराही त्याने आजच्या जयंतीदिनी आपल्या ट्विटमधून दिला आहे. तसंच शिवरायांचा अश्वावर आरुढ झालेला एक फोटो सेहवागने ट्विट केला आहे.

राज्यात तसंच देशात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. ठिकठिकाणी शिवाजीराजांना अभिवादन केलं जातंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदींनी शिवजयंतीदिनी ट्विट करत राजेंच्या चरणी त्रिवार अभिवादन केलं आहे.

किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा सोहळा

आपल्या प्रत्येकाच्या हृदयात छत्रपती शिवरायांचे अढळ स्थान आहे. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते. सध्या वातावरण चांगले आहे पण तोंडावर मास्क आहे. छत्रपती दैवत का आहे, तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात होती. कोरोनाशी लढतांना ही प्रेरणा व जिद्द आम्हाला मिळते आहे. आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवराय आहेत, असे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जगात शिवरायांचे तेज पसरविणार असल्याचे सांगितले. किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला.

हे ही वाचा :

Video | शिवजयंतीला सर्वाधिक गाणं कोणतं वाजतंय? आदर्श शिंदेचं गाणं लाखोंनी बघितलं, तुम्ही पाहिलं?

… तर लॉकडाऊनचा निर्णय घ्यावाच लागेल; छगन भुजबळांचा इशारा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.