हत्तीने प्रेमाने पप्पी दिली, कुणालाच हसू आवरेना, गोंडस व्हिडीओ!
हा रिपोर्टर लाईव्ह रिपोर्टिंग करत असताना एक हत्ती त्याच्याकडे येतो आणि असं काही करतो की व्हिडीओ खूप मजेशीर बनतो.

सोशल मीडियावर एकापेक्षा एक मजेदार व्हिडिओ पोस्ट केले जातात. असे व्हिडिओ अनेकदा लोकांचे खूप मनोरंजन करतात आणि लोकांच्या दिवसाची सुरुवात हलकी फुलकी करतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.
हत्तींची गणना अत्यंत बुद्धिमान आणि संवेदनशील प्राण्यांमध्ये केली जाते. या व्हिडीओमध्ये रिपोर्टर एका वाइल्डलाइफ ट्रस्टबद्दल बोलत होता.
हा रिपोर्टर लाईव्ह रिपोर्टिंग करत असताना एक हत्ती त्याच्याकडे येतो आणि असं काही करतो की व्हिडीओ खूप मजेशीर बनतो. सर्वात आधी सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हायरल व्हिडिओ पाहा…
View this post on Instagram
रिपोर्टरच्या मागे उभा असलेला एक हत्ती त्याच्या कानाला गुदगुल्या करण्याचा प्रयत्न करतो. हत्ती आपल्या सोंडेचा वापर करून त्या माणसाचं चुंबन घेतो यावर लगेच तो रिपोर्टर हसतो.
या पत्रकारासोबत उपस्थित क्रू मेंबर्सना आपलं हसू आवरता आलं नाही. शेल्ड्रिक वाइल्डलाइफ ट्रस्ट अनाथ झालेल्या हत्तींच्या बचाव, पुनर्वसन आणि सुटकेसाठी काम करते. याविषयी या व्हिडीओ मध्ये हा रिपोर्टर बोलत असतो.
या व्हिडिओने सोशल मीडिया यूजर्सचेही खूप मनोरंजन केले आहे. हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे. इतकंच नाही तर हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे.
