Pankaja Munde Video : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या, ‘देर आए दुरुस्त आए, मी त्यांची लहान बहीण पण…’

Pankaja Munde Video : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या, ‘देर आए दुरुस्त आए, मी त्यांची लहान बहीण पण…’

| Updated on: Mar 04, 2025 | 1:28 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्री धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. धनंजय मुंडे यांचे पीए राजीनाम्याची एक प्रत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय सागर या बंगल्यावर दाखल झाले होते.

संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर जे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. त्यावर पंकजा मुंडे यांनी भाष्य केले. यावर बोलताना त्या म्हणाल्या, ‘संतोष देशमुखांच्या मारहाणीचे काही व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झालेत ते पाहण्याची माझी हिम्मत झाली नाही. ज्यांनी संतोष देशमुखांना इतक्या क्रूरपणे मारहाण करून हत्या केली. त्यांच्या जेवढी माणुसकी नाही ज्यांनी त्याचे व्हिडीओ काढले. तशी निर्मनुष्यता माझ्यात नाही. ज्यांनी हे कृत्य केलं. ते माझ्या पदरात असते, पोटचे असते तरी मी तेच म्हटलं असतं त्यांना कडक शासन करा’, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, इतक्या गंभीर विषयावर बोलत असताना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडे काय बोलणार याकडे माध्यमांचे लक्ष लागून होते. राजीनाम्यावर भाष्य करताना त्या म्हणाल्या, ‘मुंडेंचा राजीनामा झाला. मी त्याचंही स्वागत करते. हा राजीनामा आधीच यायला हवा होता. राजीनामापेक्षा त्यांनी मंत्रीपदाची शपथच घ्यायला नको होती. त्यामुळे हे सर्व पुढे झालं नसतं. घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला हवा होता. धनंजयनेही घ्यायला हवा होता. त्यामुळे गरीमा राखता आली असती. मी लहान बहीण आहे. पण कोणत्याही बहीण किंवा परिवारातल्या लोकांना या दुखातून जावं लागेल असं वाटत नाही. पण खुर्चीत बसल्यावर राज्याचा विचार करावा लागतो. त्या परिवार आणि कुटुंबाच्या दुखापुढे राजीनामा ही काहीच गोष्ट नाही. त्यांनी घेतला. मला वाटतं ते देर आए दुरुस्त आए.’, असं त्यांनी स्पष्टच म्हटलं.

Published on: Mar 04, 2025 01:28 PM