Pankaja Munde Video : ‘संतोष देशमुखांच्या आईची मी क्षमा मागते…’, सरपंचांच्या हत्येवर बोलताना पंकजा मुंडेंचा कठं दाटला
संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेला 82 दिवसांचा काळ उलटून गेल्यानंतर अखेर महायुतीतील राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. यावर भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी भाष्य केले आहे.
बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे, क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेला 82 दिवसांचा काळ उलटून गेल्यानंतर अखेर महायुतीतील राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. यावर भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी भाष्य केले आहे. ‘मुंबईत काय घडतंय याची मला कल्पना नाही. पण इंस्टावरची पोस्ट पाहून मला त्याची कल्पना आली आहे की नेमकं काय झालंय… मी व्यक्त झाल्यानंतर आपण सर्वांनी त्याचा सन्मान ठेवावा. त्यानंतर कोणत्याही प्रश्न-उत्तरांना जागा राहणार नाही. कारण हा विषय अत्यंत माणुसकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. संतोष देशमुखांच्या मारहाणीचे काही व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झालेत ते पाहण्याची माझी हिम्मत झाली नाही. ज्यांनी संतोष देशमुखांना इतक्या क्रूरपणे मारहाण करून हत्या केली. त्यांच्या जेवढी माणुसकी नाही ज्यांनी त्याचे व्हिडीओ काढले. तशी निर्मनुष्यता माझ्यात नाही. संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर मी पत्र दिलं होतं. देशमुखांच्या हत्येनंतर मी व्यक्त झाले होते. यात कोणाचा हात आहे हे तपास यंत्रणेलाच माहिती आहे. पण त्या आरोपींमुळे महाराष्ट्रातील समाज मान खाली घालून वावरत आहे.’, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तर गुन्हेगाराला कोणतीही जात नसते. त्यावर निर्णय घेणाऱ्या राज्यकर्त्यालाही कोणतीही जात नसली पाहिजे. देशमुख यांची हत्या झाली. ज्यांनी हे कृत्य केलं. ते माझ्या पदरात असते, पोटचे असते तरी मी तेच म्हटलं असतं त्यांना कडक शासन करा, असं म्हणत पंकजा मुंडे काहिशा भावूक झाल्यात.

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर

सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?

एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
