AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डीजेला हद्दपार करत पारंपरिक टाळ मृदंगाच्या गजरात निघाली नवरदेवाची वरात, होतेय सर्वत्र चर्चा

डीजेला हद्दपार करत पारंपरिक टाळ मृदंगाच्या गजरात निघाली नवरदेवाची वरात, होतेय सर्वत्र चर्चा

| Updated on: May 30, 2023 | 12:52 PM
Share

VIDEO | वारकरी सांप्रदायाचा वारसा जपत नवरदेवाची वरात, अनोख्या लग्नाची कुठं होतेय चर्चा?

बुलढाणा : अलिकडच्या काळात लग्न म्हटलं की लाखो रूपयांचे बॅन्ड , हजारोंचे डी.जे. याची क्रेज वाढत असतांना  त्याला अपवाद ठरावा असा लग्न सोहळा बुलढाणा जिल्ह्यातील आव्हा येथे पार पडला. डीजे नाही, बॅन्ड नाही, तर चक्क वारकरी संप्रदायाचा वारसा जपत टाळ मृदंगाच्या गजरात, शिवकिर्तनात फुगडीच्या मनमोहक आनंदात, जेष्ठ नागरिकांच्या भक्तीमय वातावरणात नवरदेवाची वरात काढण्यात आली. ही बाब सामाजात एक आदर्श निर्माण करणारी ठरत आहे. डीजेमुळे समाजात एकीकडे चिंता तर दुसरीकडे निर्धास्तपणा अशा परिस्थितीत समाजासमोर एक मोठा प्रश्न निर्माण होत असताना, त्या प्रश्नावर तोडगा ठरावा, असा आगळावेगळा लग्न सोहळा काल मोताळा तालुक्यातील आव्हा येथे पार पडला. मलकापूर तालुक्यातील बेलाड येथील जगन्नाथ केशव संबारे यांचे सुपुत्र गणेश जगन्नाथ संबारे तसेच मोताळा तालुक्यातील आव्हा येथील ओंकार मधुकर घोंगटे यांची सुकन्या निकिता ओंकार घोंगटे यांचा विवाह सोहळा आव्हा येथे पार पडला..  या विवाह सोहळ्याआधी नवरदेवाची टाळ मृदंगाच्या तालात वरात काढण्यात आली. संपूर्ण गावातून वरात फिरुन आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे पूजन करुन पुष्प हार वर आणि वधुकडून अर्पण करण्यात आले.

Published on: May 30, 2023 11:05 AM