Ashish Deshmukh News : फडणवीस, बावनकुळे भेटीवर देशमुख यांचे सूचक वक्तव्य, म्हणाले… ”माझं ही…”

| Updated on: May 20, 2023 | 1:48 PM

देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याने त्यांना तिकट देणार? ते सावनेरमधून निवडणूक लढणार असल्याच्या बातम्या येत आहेत. यादरम्यान या भेटीवरून देशमुख यांनी स्पष्टीकरण देताना, ही एक सदिच्छा भेट होती.

Follow us on

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर दौऱ्यादरम्यान काँग्रेसमधून निलंबित असलेले नेते आशिष देशमुख यांची भेट घेतल्याने सध्या अनेक चर्चांना उत आला आहे. यावेळी त्यांच्याबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) असल्याने या चर्चांना जरा अधिकच महत्व प्राप्त झालं आहे. तर देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याने त्यांना तिकट देणार? ते सावनेरमधून निवडणूक लढणार असल्याच्या बातम्या येत आहेत. यादरम्यान या भेटीवरून देशमुख यांनी स्पष्टीकरण देताना, ही एक सदिच्छा भेट होती. आमच्याच प्रवेशावरून काही बोलणं झालं नाही. फडणवीस हे विदर्भाचा विकास घडवणारे एकमेव नेते आहेत आणि पक्ष विरहित संस्कृतीच्या नात्याने ते माझ्याकडे आले होते. त्यांच्या कामाचं मी कौतुक करतो असेही देशमुख यांनी म्हटलं आहे. तर या भेटीमागे शुद्ध राजकारण असून नागपूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या दोन माजी मंत्र्यांना शह देण्यासाठी भाजप देशमुख यांच्या माध्यमातून राजकीय खेळी खेळत असल्याचं या भेटीमागून दिसून येत आहे. तर मी काँग्रेसमध्येत आहे. पण निलंबित आहे. काँग्रेस नेते सतीश चतुर्वेदी यांना जसे निलंबनानंतर पुन्हा पक्षात घेण्यात आले. त्याचप्रमाणे माझीही वापसी व्हावी अशी अपेक्षा असल्याचे देखील ते म्हणाले.