Chhagan Bhujbal : 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणावरून छगन भुजबळ नाराज ? म्हणाले… जाणं शक्य नाही, कारण नेमकं काय?
१५ ऑगस्टच्या ध्वजारोहणावरून छगन भुजबळ नाराज झाल्याची माहिती आहे. भुजबळांना गोंदियामध्ये ध्वजारोहण करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र त्यांनी गोंदियाला जाण्यास नकार दिलाय. भुजबळांची गोंदिया ऐवजी नाशिकमध्ये ध्वजारोहण करण्याची इच्छा आहे.
१५ ऑगस्टला ध्वजारोहण करण्यावरून छगन भुजबळ नाराज असल्याची माहिती आहे. १५ ऑगस्टला ध्वजारोहणासाठी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने मंत्र्यांची यादी जाहीर केली होती. या यादीनुसार गिरीश महाजनांना नाशिकमधल्या ध्वजारोहणाची तर भुजबळांना गोंदियातल्या ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र भुजबळांना नाशिकमध्ये ध्वजारोहण करण्याची इच्छा आहे. गोंदियात ध्वजारोहण करण्यासाठी ते इच्छुक नाहीत. त्यामुळे सरकारने आता गोंदियातल्या ध्वजारोहणाची जबाबदारी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे दिली. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद अद्यापही मिटलेला नाही. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजन आणि दादा भुसे इच्छुक आहेत. त्यात आता भुजबळांनी नाशिकमध्ये ध्वजारोहणाची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळही इच्छुक असल्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
