राजकारण, अनुभव आणि कामाची, संधी; पंकजा मुंडेंनी मनातील खंत बोलून दाखवली
पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे आल्या होत्या. या प्रचार सभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. त्या काय म्हणाल्यात? पाहा...
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे आल्या होत्या.या प्रचार सभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. राजकारण एवढं सोपं नाही. अनेक वर्षे कष्ट केल्यानंतर ही संधी मिळत नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. माझ्यामध्ये वाघिणीसारखा लढाऊ बाणा आहे. मुंडेसाहेब असताना लोक मला रणरागिणी म्हणायचे. आता ते गेल्यानंतर वाघीण म्हणायला लागले आहेत, असंही ते म्हणालेत.
Published on: Feb 20, 2023 07:51 AM
