Vasant More on Swargate Crime : ‘पीडितेचा मला फोन, ती रडत होती अन्…’, वसंत मोरेंसोबत 20 मिनिटं काय झाली चर्चा?
स्वारगेट स्थानकात घडलेल्या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे हे चांगलेच आक्रमक झाले होते. यानंतर त्यांनी या घटनेचा पाठपुरावा केला. दरम्यान, पुणे अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीचा वसंत मोरेंना फोन आल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात पुणे येथील स्वारगेट बस स्थानकात धक्कादायक प्रकार घडला. स्वारगेट स्थानकात एका उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरूणीवर एका नराधमाकडून अत्याचार करण्यात आले. या घटनेनंतर राज्यभरात एकच संतापाची लाट उसळली. घडलेल्या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे हे चांगलेच आक्रमक होत त्यांनी स्वारगेट बसस्थानकात जाऊन सुरक्षा रक्षकांचं कार्यालय फोडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर त्यांनी या घटनेचा पाठपुरावा केला. दरम्यान, पुणे अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीचा वसंत मोरेंना फोन आल्याचे त्यांनी सांगितले. नेमकं काय बोलणं झालं हे सांगत असताना वसंत मोरे म्हणाले, मला संबंधित तरुणीचा आणि तिच्या मित्राचा फोन आला होता, मी 20 मिनिटं तिच्याशी बोलत होतो. ती खूप रडत होती. या प्रकरणात तिची रोज चौकशी होतेय. प्रत्येक अधिकाऱ्याला ती रडून रोज तेच तेच सांगत आहे. आरोपी सुखात आत जाऊन बसला आहे, मात्र पीडित तरुणीला रोज वेळ देऊन चौकशी केली जातेय.तिला बसवून ठेवले जात आहे. 7500 रुपये दिले तर 48 तास पीडित मुलीची बॅग पोलीस ठाण्यातच होती, मग तेव्हा का नाही तपासणी करण्यात आली? पोलिसांच्या कोणत्याच स्टेटमेंटमध्ये 7500 रुपयांचा उल्लेख नाही? असे एक ना अनेक सवाल वसंत मोरे यांनी उपस्थित केल्याचे यावेळी पाहायला मिळाले.