Special Report | शिवसेना- संभाजी ब्रिगेडची युती, मविआचं काय?

| Updated on: Aug 27, 2022 | 1:57 AM

संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काहीही बोलले नाही. पण शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंनी, बुडत्याला काडीचा आधार म्हटलंय. तर भाजपनं शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवरुन सडकून टीका केलीय.

Follow us on

Special Report | शिवसेना- संभाजी ब्रिगेडची युती, मविआचं काय?-tv9

मुंबई : उद्धव ठाकरेंनी आता संभाजी ब्रिगेडची साथ घेतलीय. शिवसेनेत फूट आणि महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर, शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडशी युती केलीय. सध्याच्या फुटीची राजकारणावरुन भाजपवर टीका करताना, प्रादेशिक अस्मिता जपण्यासाठीच संभाजी ब्रिगेडशी युती करत असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. 2019च्या निकालानंतर अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदासाठी भाजपशी युती तोडली. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद मिळवत कट्टर विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीशी महाविकास आघाडी केली आणि आता संभाजी ब्रिगेडसोबत शिवसेनेनं युती केलीय. संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काहीही बोलले नाही. पण शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंनी, बुडत्याला काडीचा आधार म्हटलंय. तर भाजपनं शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवरुन सडकून टीका केलीय.