5

सिंगल चार्जमध्ये 120KM रेंज, मेड इन इंडिया स्कूटर बाजारात, किंमत 80 हजारांपेक्षा कमी

ही स्कूटर एका स्टार्टअप कंपनीने बनवली आहे. कंपनीने दावा केला आहे की, त्यांची स्कूटर अवघ्या 5 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास इतक्या वेगाने धावू शकते. त्याची लोडिंग क्षमता 150 किलोपर्यंत आहे. ही स्कूटर व्हाईट, रेड, ब्लू, ब्लॅक, ग्रे आणि सिल्व्हर अशा एकूण 6 रंगांच्या पर्यायांमध्ये येते.

सिंगल चार्जमध्ये 120KM रेंज, मेड इन इंडिया स्कूटर बाजारात, किंमत 80 हजारांपेक्षा कमी
Pure Ev Etrance Neo
Follow us
| Updated on: Nov 14, 2021 | 6:25 PM

मुंबई : भारतीय बाजारात दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. अनेक परदेशी आणि भारतीय कंपन्या ठराविक अंतराने देशात इलेक्ट्रिक वाहनं लाँच करत आहेत. बाजारात काही इलेक्ट्रिक स्कूटर्सना चांगलीच मागणी आहे, आज आम्ही तुम्हाला अशाच एका खास इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल सांगणार आहोत, या स्कूटरची किंमत 80 हजार रुपयांपेक्षा कमी आहे, तसेच ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 120 किमी प्रवास करू शकते. या स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 60 किलोमीटर इतका आहे. किंमतीच्या बाबतीत ही स्कूटर Ola S1 आणि TVS iQube ला टक्कर देते. या दोन्ही स्कूटरच्या किंमती 1 लाख रुपयांच्या आसपास आहेत. (Pure EV Etrance Neo electric scooter gives 120km range in single charge with 60kmph top speed)

ही स्कूटर एका स्टार्टअप कंपनीने बनवली आहे. कंपनीने दावा केला आहे की, त्यांची स्कूटर अवघ्या 5 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास इतक्या वेगाने धावू शकते. त्याची लोडिंग क्षमता 150 किलोपर्यंत आहे. ही स्कूटर व्हाईट, रेड, ब्लू, ब्लॅक, ग्रे आणि सिल्व्हर अशा एकूण 6 रंगांच्या पर्यायांमध्ये येते. या ई-स्कूटरला चार इंचांचा एलसीडी डिस्प्ले, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, एलईडी हेडलाइट आणि अँटी थेफ्ट स्मार्ट लॉक मिळते.

हैदराबादस्थित स्टार्टअप कंपनी Pure EV ने बनवलेली ही Etrance Neo इलेक्ट्रिक स्कूटर सध्या चर्चेचा विषय आहे. या हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 78,999 रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. या इलेक्ट्रिक स्टार्टअपचे भारतातील 20 राज्यांमध्ये 100 हून अधिक ठिकाणी डीलर्स आहेत. त्यामुळे अगदी सहजपणे ग्राहक ही स्कूटर खरेदी करु शकतात.

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 2.5kWH लिथियम बॅटरी देण्यात आली आहे. जी BLDC मोटरशी जोडलेली आहे. यात पोर्टेबल बॅटरी आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही ही बॅटरी सहज काढू शकता. ही स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर 120KM पर्यंत (ECO मोडमध्ये) रेंज देईल, या स्कूटरचा टॉप स्पीड 60 किमी आहे.

Ola S1 ला टक्कर

ही स्कूटर बाजारात Ola S1 आणि TVS च्या इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करेल. Ola इलेक्ट्रिक कंपनीच्या Ola S1 स्कूटरची किंमत 99,999 रुपये आहे. Ola S1 5 आकर्षक रंगांमध्ये येते, ई-स्कूटर सुमारे 120 किलोमीटरच्या रेंजसह येते. एस 1 प्रो, त्यांची टॉप-स्पेक ई-स्कूटर आहे, जी एका चार्जवर सुमारे 180 किलोमीटर रेंजसह येते असा दावा कंपनीने केला आहे.

एस 1 मॉडेलसाठी ओला इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी आउटपुट 2.98 kWh असेल, तर थोडी महाग असलेल्या एस 1 प्रो मॉडेलमध्ये 3.97 kWh बॅटरी देण्यात आली आहे. S1 Pro ची टॉप स्पीड 115 kmph इतकी आहे, ज्यामध्ये हायपर समाविष्ट आहे. S1 आणि S1 Pro दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर फुल LED लायटिंग पॅकेज आणि नेव्हिगेशनसह 7.0-इंच टच डिस्प्लेसह येतात. हा डिस्प्ले 3GB रॅमसह ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करतो. यामध्ये वायफाय, ब्लूटूथ आणि 4G कनेक्टिव्हिटी सपोर्ट देण्यात आला आहे.

इतर बातम्या

Yezdi Adventure मोटारसायकल लवकरच भारतात लाँच होणार, रॉयल एनफील्डला टक्कर

2022 Hyundai Creta फेसलिफ्टचा ग्लोबल डेब्यू, जाणून घ्या भारतात कधी लाँच होणार?

Mahindra लवकरच देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार, जाणून घ्या कारमध्ये काय असेल खास

(Pure EV Etrance Neo electric scooter gives 120km range in single charge with 60kmph top speed)

Non Stop LIVE Update
रोहित पवार यांनी विधानसभा अध्यक्षांना फटकारलं, '..तीन महिने काय केलं?'
रोहित पवार यांनी विधानसभा अध्यक्षांना फटकारलं, '..तीन महिने काय केलं?'
शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीवर काँग्रेस नेत्याचं मोठं भाष्य
शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीवर काँग्रेस नेत्याचं मोठं भाष्य
उल्हासनगरमधील नामांकित कंपनीत ब्लास्ट, रोहित पवार घटनास्थळी... म्हणाले
उल्हासनगरमधील नामांकित कंपनीत ब्लास्ट, रोहित पवार घटनास्थळी... म्हणाले
2024 मध्ये मुख्यमंत्री कोण? फडणवीस की शिंदे? भाजप आमदाराचा दावा काय?
2024 मध्ये मुख्यमंत्री कोण? फडणवीस की शिंदे? भाजप आमदाराचा दावा काय?
प्रसाद लाड यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य
प्रसाद लाड यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य
'विजय वडेट्टीवार आहे तरी कोण?', भाजपच्या बड्या नेत्याचा थेट सवाल
'विजय वडेट्टीवार आहे तरी कोण?', भाजपच्या बड्या नेत्याचा थेट सवाल
उल्हासनगरच्या सेंच्युरीत भीषण स्फोट, काय कारण अन् किती कामगार दगावले?
उल्हासनगरच्या सेंच्युरीत भीषण स्फोट, काय कारण अन् किती कामगार दगावले?
नागपुरात मुसळधार पावसाचं थैमान, नाग नदीवरील पूल कोसळला अन्...
नागपुरात मुसळधार पावसाचं थैमान, नाग नदीवरील पूल कोसळला अन्...
विजय वडेट्टीवारांची शिवसेनेतील अपात्र आमदारांसंदर्भात मोठी मागणी काय?
विजय वडेट्टीवारांची शिवसेनेतील अपात्र आमदारांसंदर्भात मोठी मागणी काय?
'लालबागच्या राजा'च्या दर्शनासाठी आलेल्या तरूणीला मंडपातच भोवळ अन्...
'लालबागच्या राजा'च्या दर्शनासाठी आलेल्या तरूणीला मंडपातच भोवळ अन्...