लग्न ठरले तरी Instagram वर रिल्स टाकायची, नवरोबाचा लग्नाआधीच काडीमोड

या संदर्भात वधूने सोशल मीडियावर आपला व्हिडीओ पोस्ट करुन पोलिसांची मदत मागितली आहे. या व्हिडीओद्वारे मुलाला स्विफ्ट डिझायर हवी होती म्हणूनच त्याने हे लग्न मोडल्याचे म्हटले आहे.

लग्न ठरले तरी Instagram वर रिल्स टाकायची, नवरोबाचा लग्नाआधीच काडीमोड
| Updated on: Feb 20, 2025 | 8:41 PM

मोबाईलने आपले दैनंदिन जीवन व्यापले आहे. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत आपण मोबाईलच्या इतक्या अधीन गेलो आहे की आपल्याला घरातल्या माणसांशी देखील बोलायला वेळ नाहीए…या मोबाईलच्या सवयी एक होणारा संसार जुळण्या आधीच तुटला आहे. लग्नाचा साखरपुडा झाला आणि होणाऱ्या वधू-वराने एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले. त्यानंतर आपल्या होणाऱ्या लग्नाची गोड स्वप्न पाहणाऱ्या तरुणीला धक्का बसला. कारण होणाऱ्या नवऱ्याने तिच्या रिल्स इंस्टाग्रामवर पाहिल्या आणि त्याचे टाळके सटकले,त्याने थेट काडीमोड घेतला आहे. आता पोलिसांनी दोघांचे जबाब घेतले असून चौकशी सुरु आहे.

हे प्रकरण उत्तर प्रदेशातील शहाजहापूर येथील आहे. या तरुणीचा विवाह १६ फेब्रुवारीला उन्नाव जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणासोबत होणार होता. मुलीच्या वडीलांनी आपले शेत गहाण ठेवून लग्नाचा बंदोबस्त केला होता. परंतू ऐन लग्नाच्या आदल्या दिवशी मुलाकडील लोकांनी स्विफ्ट डिझायर पाहीजे असा तगादा लावण्याची तक्रार मुलीकडच्या लोकानी केला आहे. कार देण्याची आमची लायकी नाही असे सांगत नवरीच्या पित्याने हे लग्न आता मुलांकडील लोकांनी तोडल्याचे म्हटले आहे.

इंस्टावर रिल्स टाकत असल्याने

या प्रकरणातील माहिती अशी की १० ऑगस्ट २०२४ रोजी आमची साखर पुडा आणि इतर विधी पार पडले. या कार्यक्रम उन्नाव जिल्ह्यातील मंदिरात संपन्न झाला. त्यानंतर मुलीच्या लोकांनी लग्नाचा बंदोबस्त केला आहे. लग्नासाठी लॉन बुक केला आहे. १६ फेब्रुवारी रोजी लग्न होणार होते. परंतू १५ फेब्रुवारीला वराने फोन करुन लग्नाला नकार दिला. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात शाहजहांपूर पोलिस ठाण्या गुन्हा दाखल केला गेला आहे. वराने आपली होणारी पत्नी लग्न ठरल्यानंतर इंस्टाग्रामवर रिल्स टाकत असल्याने हे लग्न मोडल्याचे म्हटले आहे या प्रकरणात आता पोलिस पुढील तपास करीत आहेत.