नाशिकध्ये पुन्हा बर्निंग बसचा थरार! शिवशाही पेटली, बसमध्ये 45 प्रवासी, त्यांचं काय झालं?

| Updated on: Nov 02, 2022 | 11:17 AM

नाशिक पुणे हायवेवर शिवशाही बसमध्ये आगडोंब! बघता बघता अख्खी बस आगीने कवेत घेतली, पाहा व्हिडीओ

नाशिकध्ये पुन्हा बर्निंग बसचा थरार! शिवशाही पेटली, बसमध्ये 45 प्रवासी, त्यांचं काय झालं?
नाशिकमध्ये बर्निंग बसचा थरार
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नाशिक : नाशिकमध्ये खासगी बस दुर्घटनेत (Nashik Bus Fire) प्रवासी होरपळ्याची घटना होऊन आता काही दिवस उलटलेत. मात्र आज पुन्हा एकदा नाशिकमध्ये बर्निंग बसचा (Nashik Accident) थरार पाहायला मिळालाय. नाशिक पुणे महामार्गावर महामंडळाची शिवशाही बस (Shivshahi Bus) पेटली. या बसमध्ये एकूण 45 प्रवासी होते. या प्रवाशांना वेळीच बसमधून खाली उतरवण्यात आल्यानं थोडक्यात मोठा अनर्थ टळला. मात्र बघता बघता संपूर्ण बस जळून खाक झाली.

पुणे नाशिक हायवेवर सिन्नर येथे अचानक शिवशाही बसने पेट घेतला. शॉर्ट सर्किटमुळे ही बस पेटली असावी, अशी शंका व्यक्त केली जातेय. मात्र आग कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. आग नियंत्रणात आणण्यासाठी बचावकार्यही करण्यात आलं. पण अवघ्या काही मिनिटांत बस जळून खाक झाली.

पाहा व्हिडीओ :

हे सुद्धा वाचा

अनर्थ टळला

थोडक्यात मोठ्या दुर्घटनेतून बचावल्यामुळे बसमधील सर्व प्रवाशाांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र बस पेटण्याच्या घटना वारंवार समोर येत असल्यामुळे आता चिंता व्यक्त केली जाते आहे. याआधीही अनेकदा शिवशाही बसला आग लागला्याच्या घटना समोर आल्या आहेत.

45 प्रवाशांनी खचाखच भरलेल्या शिवशाही बसमधून वेळीच प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं. त्यामुळे आगीच्या या घटनेतील जीवितहानी टळली. इंजिनवर पाणी टाकून नंतर आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता.

नाशिकमध्ये काही आठवड्यांपूर्वीच एका खासगी बसला भीषण आग लागली होती. कंटेरनच्या धडकेनंतर डिझेल टँक फुटून संपूर्ण बस पेटली होती. यात बसमधील 10 प्रवासी जिवंत होरपळले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, आता थोडक्यात या दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता टळलीय.