AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे अपघात प्रकरणात मोठी अपडेट, अल्पवयीन मुलाची आईसुद्धा अडचणीत, डॉ. पल्लवी सापळे यांच्या अहवालात नेमके काय?

pune Porsche accident: पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणात डॉ. अजय तावरेचा डॉ. श्रीहरी हाळनोरवर दबाव होता, अशी माहिती समोर आली आहे. डॉ. तावरे व विशाल यांचे बोलणे झाल्यानंतर रक्त बदल करण्यासाठी मला तावरे यांनी दबाव टाकला, अशी कबुली हाळनोर यांनी दिली.

पुणे अपघात प्रकरणात मोठी अपडेट, अल्पवयीन मुलाची आईसुद्धा अडचणीत, डॉ. पल्लवी सापळे यांच्या अहवालात नेमके काय?
pune accident
Updated on: May 30, 2024 | 11:55 AM
Share

pune porsche accident: पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात धक्कादायक खुलासे होण्याची परंपरा सुरु आहे. आता या प्रकरणात अल्पवयीन मुलाची आईसुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे. १९ मे रोजी पोर्श कार चालवत अल्पवयीन मुलाने दोघांना उडवले होते. त्यानंतर त्या मुलाचे वडील आणि पुणे शहरातील नामांकीत बिल्डर विशाल अग्रवाल यांना अटक झाली होती. मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी कार चालकाला डांबून ठेवत धमकवले होते. त्या प्रकरणात त्यांनाही अटक झाली. आता या प्रकरणात नेमलेल्या डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या समितीच्या अहवालावरुन अल्पवयीन मुलाची आई अडचणीत येणार आहे. त्या अहवालानुसार पुरावा नष्ट करण्याच्या प्रकरणात आईवर टांगती तलवार असणार आहे.

मुलाच्या आईने काय केले…

अल्वपयीन मुलाच्या अपघात प्रकरणात पुणे येथील ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना अटक झाली. त्यांच्यावर अल्पवयीन मुलांचे ब्लड सॅम्पल बदलण्याचा आरोप आहे. त्यानंतर त्या मुलांऐवजी ब्लड सॅम्पल कोणी दिले? असा प्रश्न पुढे आला. त्याचे उत्तर या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अहवालातून मिळाले आहे. अल्पवयीन मुलाच्या आईने ब्लड सॅम्पल दिल्याचे त्या अहवालात नमूद केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे पुरावा नष्ट करण्याच्या प्रकरणात आईवर अटकेची टांगती तलवार आहे. या प्रकरणात अग्रवाल कुटुंबातील तीन पिढया कारागृहात असताना आता कुटुंबातील महिलाही अडचणीत आली आहे.

काय आहे त्या अहवालात?

डॉक्टर पल्लवी सापळे यांनी दिलेल्या अहवालात मोठी माहिती समोर आली आहे. ससूनमध्ये अल्पवयीन आरोपीचे म्हणून तीन व्यक्तीचे ब्लड सँपल घेण्यात आले. त्यात एक महिला आणि दोन वयस्कर व्यक्तींचे ब्लड सॅम्पल घेण्यात आले होते. डॉक्टर श्रीहरी हरणोळ याने हे तीन ब्लड सम्पल घेतले. सबंधित महिलेची ब्लड सम्पल हे अल्पवयीन आरोपीच्या आईचे ब्लड सम्पल असल्याची माहिती अहवालात दिली आहे.

डॉक्टर अजय तावरेकडून दबाब- हाळनोर

पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणात डॉ. अजय तावरेचा डॉ. श्रीहरी हाळनोरवर दबाव होता, अशी माहिती समोर आली आहे. डॉ. तावरे व विशाल यांचे बोलणे झाल्यानंतर रक्त बदल करण्यासाठी मला तावरे यांनी दबाव टाकला, अशी कबुली हाळनोर यांनी दिली. रक्त बदल केले हे माझ्या मनाला पटत नव्हते. माझ्याकडून मोठी चूक झाल्याचे मला वाटत होते, असे हाळनोर यांनी म्हटले आहे. डॉ. श्रीहरी हाळनोर सध्या गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत आहे.

महाराष्ट्र सरकार आक्रमक

पुणे अपघात प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकार आक्रमक भूमिकेत आहे. मंत्री संभूराजे देसाई यांनी उत्पादन शुल्क विभागाची तातडीची बैठक बोलवली आहे. आज दुपारी १ वाजता पावनगड या बंगल्यावर आयुक्त कार्यालयात महत्वाच्या अधिकाऱ्यांसोबत ही बैठक होणार आहे. या बैठकीत गेल्या काही दिवसांत किती कारवाया झाल्या, किती अनधिकृत पब्ज आहेत, याची माहिती घेतली जाणार आहे. आतापर्यंत ७० पब्सवर कारवाई झाली आहे. तसेच एक्साईज विभाग नाईट लाईफ संदर्भात नवी नियामावली आणण्याच्या तयारीत आहे.

शरद पवार भाकरी फिरवणार? रोहित पवारांवर मोठी जबाबदारी देणार!
शरद पवार भाकरी फिरवणार? रोहित पवारांवर मोठी जबाबदारी देणार!.
मुद्द्यांची चर्चा गुद्द्यांवर! मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी
मुद्द्यांची चर्चा गुद्द्यांवर! मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी.
फडणवीसांनी सुनावलं, शिंदेंनी चांगलच झापलं! शिरसाट आणि गायकवाड अडचणीत
फडणवीसांनी सुनावलं, शिंदेंनी चांगलच झापलं! शिरसाट आणि गायकवाड अडचणीत.
तेव्हा मला पक्षाने साथ दिली नाही..; प्रकाश महाजनांनी बोलून दाखवली खंत
तेव्हा मला पक्षाने साथ दिली नाही..; प्रकाश महाजनांनी बोलून दाखवली खंत.
मी जातोय, पण..; राष्ट्रवादीच्या बैठकीत फूल मेलोड्रामा,जयंत पाटील भावूक
मी जातोय, पण..; राष्ट्रवादीच्या बैठकीत फूल मेलोड्रामा,जयंत पाटील भावूक.
कचरा.. शी.. शी.. शी..; राणेंना पाहून आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली
कचरा.. शी.. शी.. शी..; राणेंना पाहून आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची प्रदेशाध्यक्षपदाची धुरा शशिकांत शिंदेंवर
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची प्रदेशाध्यक्षपदाची धुरा शशिकांत शिंदेंवर.
भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण! अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले
भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण! अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले.
मनसेच्या शिबिरात युती बाबत राज ठाकरेंचं मोठं विधान
मनसेच्या शिबिरात युती बाबत राज ठाकरेंचं मोठं विधान.
मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्..
मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्...