
बिग बॉस फेम देवोलीना भट्टाचार्य सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव असते. देवोलीना अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते.

ऑन स्क्रिन साधीभोळी दिसणारी गोपी बहू खऱ्या आयुष्यात फार ग्लॅमरस आहे.

आता अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्यनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे.

देवोलीना 'साथ निभाना साथिया' या मालिकेच्या सीझन 2 मध्ये दिसली होती. हा शो नुकतंच आला आहे आणि यासह तिने पुन्हा एकदा चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केलंय. यावेळी देवोलीनाची भूमिका थोडी लहान होती.

साथ निभाना साथियाच्या पहिल्या सीझनमध्ये देवोलीना भट्टाचार्य मुख्य भूमिकेत दिसली होती. या शोमुळे तिला बरीच प्रसिद्धी मिळाली. यानंतर ती बिग बॉस 13 मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. मात्र तिला शो जिंकता आला नाही.