गोविदांचं 31 वर्षांपूर्वीचं गाणं, ऐकू येताच चाहते धरतात ठेका, आजही अनेकांचं आवडतं

आनंद-मिलिंद यांच्या आवजातील प्रचंड सुंदर गाणं, ज्यावर गोविंदा-करिश्मा कपूरच्या डान्सने प्रेक्षकांना लावलेलं वेड. 31 वर्षानंतरही ऐकू येताच चाहते धरतात ठेका.

गोविदांचं 31 वर्षांपूर्वीचं गाणं, ऐकू येताच चाहते धरतात ठेका, आजही अनेकांचं आवडतं
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 12, 2026 | 2:20 PM

बॉलिवूडच्या 90 च्या दशकावर अभिनेता गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या जोडीने अक्षरशः राज्य केलं. अभिनयासोबतच दोघांच्या जबरदस्त डान्स केमिस्ट्रीने प्रेक्षकांना वेड लावलं. 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट ‘कुली नंबर 1’ चित्रपटातील ‘हुस्न है सुहाना’ हे गाणं त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झालं होतं. गाणं प्रदर्शित होताच गल्लोगल्ली, पार्ट्यांमध्ये आणि लग्नसमारंभात त्याचीच धूम पाहायला मिळाली.

गोविंदाचे बेफाम आणि मजेशीर डान्स स्टेप्स, तर करिश्माचा उत्साही अंदाज यामुळे या गाण्याला वेगळीच रंगत आली. आजही 90 च्या दशकातील आयकॉनिक गाण्यांमध्ये ‘हुस्न है सुहाना’चा आवर्जून उल्लेख केला जातो.

अभिजीत-चंदना यांच्या आवाजाने गाणं गाजलं

‘हुस्न है सुहाना’ला अभिजीत भट्टाचार्य आणि चंदना दीक्षित यांनी आवाज दिला होता. या गाण्याचं संगीत आनंद-मिलिंद या जोडीने दिलं तर प्रसिद्ध गीतकार समीर यांनी गाण्याचे बोल लिहिले होते. गाण्याची ठेका धरायला लावणारी धून आणि जोशपूर्ण संगीतामुळे ते आजही ऐकताना पाय थिरकू लागतात.

अभिजीत यांच्या आवाजातील गोविंदाची मस्ती आणि चंदना दीक्षित यांच्या आवाजातील करिश्माचा नटखटपणा पडद्यावरील पात्रांशी अगदी चपखल जुळला होता. त्यामुळे गाणं आणि त्यातील कलाकारांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून राहिली.

‘कुली नंबर 1’ची भन्नाट कथा

डेव्हिड धवन दिग्दर्शित या चित्रपटाची कथा लग्न जुळवणारे पंडित शादीराम घरजोडे यांच्या बदलेभोवती फिरते. श्रीमंत आणि गर्विष्ठ होशियारचंद पंडिताचा अपमान करतो. त्याचा बदला घेण्यासाठी पंडित कुली म्हणून काम करणाऱ्या राजूला श्रीमंत राजकुमार असल्याचं भासवतो.

होशियारचंद आपली मुलगी मालती म्हणजेच करिश्मा कपूर हिचं लग्न राजूसोबत लावून देतो आणि त्यानंतर चित्रपटात कॉमेडी, गैरसमज आणि नाट्यमय घटनांची भन्नाट मालिकाच सुरू होते. गोविंदा आणि करिश्मासोबतच शक्ती कपूर, सदाशिव अमरापूरकर, कादर खान, हरीश कुमार आणि कंचन यांसारख्या कलाकारांनीही आपल्या अभिनयाने चित्रपट गाजवला.

बजेटच्या सहापट कमाई करत ठरला सुपरहिट

30 जून 1995 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘कुली नंबर 1’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. अवघ्या 3.50 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने भारतात सुमारे 12.56 कोटी रुपयांचा नेट कलेक्शन केला तर जगभरात त्याची कमाई 21.22 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us